महाराष्ट्र

शिरूर अनंतपाळ नंतर चाकूर नगर पंचायत,निवडणुकीचा जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी घेतला आढावा

 

महाराष्ट्र खाकी ( चाकूर ) – मा.राज्‍य निवडणूक आयोग,महाराष्‍ट्र राज्‍य, यांचे पत्र दि. 24 डिसेंबर 2021 चे आदेशान्‍वये चाकूर नगर पंचायत, सार्वत्रिक निवडणूक 2021 च्‍या होणा-या निवडणूकी संदर्भात सविस्‍तर आढावा घेण्‍यासाठी आज दि.16 डिसेंबर 2021 रोजी स.11.00 जिल्‍हाधिकारी पृथ्‍वीराज बी.पी. यांनी निवडणूक निर्णय अधिकारी, चाकूर नगर पंचायत, चाकूर यांच्‍या कार्यायात आढावा बैठक घेतली.

या आढावा बैठकीत जिल्‍हाधिकारी यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची माहिती घेतली व नागरीकांच्‍या मागास प्रवर्गासाठी आरक्षीत असलेले प्रभाग क्रं.5,8,13,14 संदर्भात मा.निवडणूक राज्‍यआयोग यांनी दिलेल्‍या निर्देशाप्रमाणे केलेल्‍या कार्यवाहीचा आढावा घेऊन निवडणूक आचारसहिंता बाबत मार्गदर्शन करुन शहरातील मतदान केंद्राची पहाणी करुन दि.21 डिसेंबर 2021 रोजी होणारे मतदानाची टक्‍केवारी वाढविणेसाठी मतदारमध्‍ये जनजागृती करणेस आदेशीत करुन निवडणूका या पारदर्शक व सुव्‍यस्थित पारपाडणे या बाबत मार्गदर्शन केले.

यावेळी प्रविण फुलारी, निवडणूक निर्णय अधिकारी, तथा उपविभागीय अधिकारी, अहमदपूर, यांनी माहिती दिली की, 17 प्रभागा करीता 115 नामनिर्देशनपत्र प्राप्‍त झालेली होती. तथापी राज्‍य निवडणूक आयोग यांचे आदेश दि. 07 डिसेंबर 2021 अन्‍वये नागरीकांच्‍या मागास प्रवर्गासाठी आरक्षीत असलेले प्रभाग क्रं.5,8,13,14 या सर्व जागासाठीचे निवडणूक प्रक्रिया आहे. त्‍या टप्‍प्‍यावर तात्‍काळ स्‍थगिती करण्‍यात आलेली आहे. उर्वरीत 13 प्रभागासाठी नियोजित कार्यक्रमानुसार प्रकिया राबविण्‍यात येत आहे. नामनिर्देशन पत्र मागे घेण्‍याच्‍या अंतीम मुदतीपर्यंत एकूण 16 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे मागे घेतली त्‍यामुळे 13 जागांसाठी अंतीमरित्‍या 58 उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. त्‍याकरीता 23 मतदान केंद्र निश्‍चित केले आहेत.व निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व सुव्‍यस्थितरित्‍या पारपाडण्‍यासाठी आवश्‍यक तो पोलीस बदोंबस्‍त व अधिकारी/ कर्मचारीयांचे पथक तयार केलेले आहेत.

या निवडणुकासंदर्भात आजपावेतो झालेल्‍या निवडणूक प्रक्रियेसंबधी जिल्‍हाधिकारी यांनी या निवडणूक संदर्भात 13 मतदान क्रेंदाचा आढावा घेत आवश्‍यक मतदान केंद्राची निवड, मतदान केंद्रनिहाय मतदान, मतदारांची एकूण संख्‍या, मतदान केंद्रावर दिल्‍या जाणा-या सोयीसुविधा विशेषतः वृध्‍द, अपंग व गरोदर स्त्रीया यांच्‍यासाठी आवश्‍यक असणा-या सुविधाचा तपशील जाणून घेतला त्‍याच बरोबर जिल्‍हाधिकारी या निवडणूकी संदर्भात मतदार यादी, आचार संहिता,कायदा व सुव्‍यस्‍था, संवेदनशील किंवा अतिसंवेदनशील मतदार केंद्राची माहिती व मद्य विक्रीबंदी, शस्ञ जमा करणे, मतदानाची कार्यवाही दरम्यान आवश्‍यक असणारा पोलीस बंदोबस्‍त, मतदान यंत्राचा तपशील, मतदान केंद्रनिहाय अधिकारी / कर्मचारी यांचे प्रशिक्षण, मतदार जागती मोहिम, मतमोजणी करीताचे प्रशिक्षण साहित्‍य उपलब्‍धता बाबतचा सविस्‍तर आढावा घेवून समाधान व्‍यक्‍त केले. याचवेळी ईव्‍हीएम सिलींग प्रकियेची पहाणी करुन ईव्‍हीएम सुरक्षेतेसाठी करण्‍यात आलेल्‍या स्‍ट्रॉंग रुमची पहाणी उपलब्‍ध असणा-या सोयी-सुविधांचा आढावा घेवून आवश्‍यक त्‍या सूचना दिल्‍या. यावेळी चाकूर नगर पंचायतचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रविण फुलारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, अजिंक्‍य रणदिवे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, तथा मुख्‍याधिकारी, नगर पंचायत, चाकूर तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

Most Popular

To Top