लातूर जिल्हा

लातूर शहर मनपा दशपूर्ती आणि आगामी होणाऱ्या निवडणुकिसाठी प्रभागात होणार सर्वे

महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर शहर महानगरपालिकेला नुकतेच 10 वर्ष पूर्ण झाले या दहा वर्षात अनेक नगरसेवक होऊन गेले कोण सतत निवडून येत आहेत. दहा वर्षानंतर लातूर शहर महानगरपालिकेचा विस्तार झाला आहे अगोदर 70 नगरसेवक होते आता विस्तारानंतर 81 नगरसेवक होणार आहेत. मागील पाच वर्षात नगरसेवकांनी आपल्या प्रभागात किती विकास कामे केली आहेत किती सरकारी योजना नागरिकांपर्यंत पोहचवल्या आहेत ?. कोणत्या नगरसेवकाने प्रभागात किती वेळ दिला ?. प्रभागातील लोक त्यांच्या कामाबद्दल समाधानी आहेत का ? आणि यावेळेस परत त्यानां संधी देतील का ? लातूर मनपाचा कोणत्या पक्षाच्या कार्यकाळात विकास झाला आणि कोणत्या पक्षाला निवडून देणार ? महापौर म्हणून कोणाचे कार्य उत्तम वाटते ? अशा गोष्टींचा सर्वे होणार आहे. हा सर्वे “खाकी फाऊंडेशन” करणार आहे. या सर्वेला “रिपोर्ट कार्ड नगरसेवक” असे नाव दिले आहे. खाकी फाऊंडेशन तर्फे लातूरच्या जनतेला आवाहन आहे की आपल्या प्रभागातील नगरसेवकांबद्दल किंवा त्यांच्या कार्याबद्दल काही सांगायचे असतील तर खाकी फाऊंडेशन ला कळवू शकता. लवकरच शहरात खाकी फॉउंडेशन सर्वे आणि संपर्क नंबर जाहीर करेल.

Most Popular

To Top