महाराष्ट्र

लोकसंख्या वाढीमुळे आणि नागरी विकास योजना वाढवण्यासाठी नगरपरिषदा आणि महानगरपालिकेलीत नगरसेवक संख्या वाढली

महाराष्ट्र खाकी (लातूर) – महाराष्ट्रातील झपाट्याने वाढलेली लोकसंख्या पाहता नागरी विकास योजनांचा वेग वाढवण्याची गरज लक्षात घेऊन 26 महानगरपालिका व सर्व नगरपरिषदांमधील नगरसेवकांच्या संख्येमध्ये वाढ
करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
होते. मुंबई महानगरपालिकेतील सध्याची 227 ही नगरसेवक संख्या मात्र कायम असेल. सध्या महानगरपालिकांतील सदस्य संख्या किमान 65 सदस्य व कमाल 175 इतकी आहे. तर नगरपरिषदांमधील सदस्य संख्या किमान 17 सदस्य व कमाल 65 इतकी आहे. महानगरांमधील व लहान नागरी क्षेत्रांमध्ये झालेले रचनात्मक परिवर्तन व नागरी समस्यांची उकल व विकास योजनांचा वेग वाढविणे यासाठी सर्व कार्यक्षेत्राला योग्य न्याय देण्याच्या दृष्टीने सदस्य संख्या वाढविण्याची
आवश्यकता आहे.

2011च्या जनगणनेच्या आकडेवारीच्या आधारावर महानगरपालिका व नगरपरिषदांमधील सदस्य
संख्या निर्धारित आहे. कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे 2021 च्या जनगणनेचे निष्कर्ष अप्राप्त आहेत. त्यास
आणखी काही कालावधी लागणार आहे. या कालावधीत लोकसंख्या वाढीचा सरासरी वेग गृहीत धरुन अधिनियमात नमुद केलेल्या महानगरपालिका व नगरपरिषदांच्या किमान सदस्य संख्येत 17 टक्के इतकी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. किमान सदस्य संख्या वाढविल्यामुळे पुढील सदस्य संख्या देखील वाढेल व त्यामुळे पर्याप्त सदस्य संख्या निश्चित होईल.

महानगरपालिकांमध्ये 3 लाखांपेक्षा अधिक व 6 लाखांपर्यंत लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या
पालिका सदस्यांची किमान संख्या 76 व अधिकत्तम संख्या 96 पेक्षा अधिक नसेल.

6 लाखांपेक्षा अधिक व 12 लाखांपर्यंत लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान
संख्या 96 व अधिकत्तम संख्या 126 पेक्षा अधिक नसेल.

12लाखांपेक्षा अधिक व 14 लाखांपर्यंत लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची
किमान संख्या 126 व अधिकत्तम संख्या 156पेक्षा अधिक नसेल.

24 लाखांपेक्षा अधिक व 30 लाखापर्यंत लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची
किमान संख्या 156 व अधिकत्तम संख्या 168 पेक्षा अधिक नसेल.

330 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या 168 व
अधिकत्तम संख्या 185 पेक्षा अधिक नसेल.

अ वर्ग नगरपरिषदांमध्ये निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या 40 व अधिक संख्या 75
हून अधिक नसेल.

ब वर्ग नगरपरिषदांमध्ये निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या 25 व अधिक संख्या 37
हून अधिक नसेल.

क वर्ग नगरपरिषदांमध्ये निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या 20 व अधिक संख्या 25
हून अधिक नसेल.

नगरसेवकांची संख्या वाढल्याने कामे सुलभतेने होण्यास मदत होणार.

“राज्य शासनाच्या महापालिकेच्या सदस्यांची संख्या वाढवण्याच्या निर्णयाचे स्वागत आहे. लातूर महापालिकेत आता 23 ऐवजी 27 प्रभाग होतील. प्रभाग लहान होतील. नगरसेवकांची संख्या वाढल्याने कामे सुलभतेने होण्यास मदत होईल. शहराच्या विकासात अधिक व्यक्तींचा सहभाग गरजेचा असतो. आता नगरसेवक वाढल्याने त्या पद्धतीने नियोजन करणे सोपे जाईल.”

महापौर विक्रांत गोजमगुंडे – लातूर शहर महानगरपालिका

कोणत्या महापालिकेत किती नगरसेवक वाढणार

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील महानगरपालिकांतील वाढीव नगरसेवक संख्या पुढील
प्रमाणे असेल (कंसात सध्याची नगरसेवक संख्या)- पुणे-173 (162), नागपूर-156 (151),
औरंगाबाद-126 (115), ठाणे-142 (139), पिंपरी-चिंचवड-139 (129), नाशिक-133 (122),
कल्याण डोंबिवली-133 (122), नवी मुंबई-122 (111), वसई विरार-126 (115), अमरावती-98
(47), परभणी-76 (56), चंद्रूपर-77 (66), अहमदनगर- 79 (68), लातूर- 81 (70), धुळे-85
(74), जळगाव-86 (७५), सांगली-मिरज- कुपवाड- ८९ (७८), उल्हासनगर-८९ (78), पनवेल- 89
(78), अकोला-91 (80), कोल्हापूर-92 (81), नांदेड- वाघाळा-92 (81), मालेगाव-95 (84), भिवंडी-
निजामपूर-101 (90), मिरा-भाईंदर-106 (95) आणि सोलापूर- 193 (102).

Most Popular

To Top