महाराष्ट्र

लातूर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी occupational therapy day उमंग केंद्रावर साजरा केला.

महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – स्वमग्नता, मनोविकलांग, सेरेबल पॉलसी, मानसिक आजार, बहुविकलांग इतर दिव्यांगांना दिव्यांगावर मात करण्यासाठी उमंग ईन्सटीटयुट ऑफ ऑटीझम अँन्ड मल्टीडिसॅबीलीटी रिसर्च सेंटर कडून चांगले काम केले जात असून त्यामुळे पालकांचे मनोबल वाढत असल्याचे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी केले.

समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद लातूर व उमंग ईन्सटीटयुट ऑफ ऑटीझम अँन्ड मल्टीडिसॅबीलीटी रिसर्च सेंटर, बार्शी रोड, नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागे, शासकीय वसाहत, जिल्हा परिषद शाळा, लातूर येथील केंद्रामध्ये नुकताच जागतिक व्यवसाय उपचार चिकित्सा दिवस साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलिस अधिक्षक निखील पिंगळे,कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनिल खमितकर, सिध्दीविनायक प्रतिष्ठाण लातूरचे सचिव किरण उटगे उपस्थित होते.

या दिनाचे औचित्य साधून जिल्हयातील ऑटीझम (स्वमंग्नता), मनोविकलांग, सेरेब्रल पॉलसी,मानसिक आजार, बहुविकलांग व इतर दिव्यांग मुले व त्यांचे पालक यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास उपस्थित असलेल्या पालकामधून 04 पालकांनी उमंग ईन्सटीटयुट ऑफ ऑटीझम अँन्ड मल्टीडिसॅबीलीटी रिसर्च सेंटर येथील डॉक्टर व त्यांचे टिमव्दारे योग्य उपचार पध्दती दिल्याने त्यांच्या पाल्यामध्ये चांगल्या प्रकारे सुधारणा होत असलेबाबत समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी केंद्रामध्ये उपलब्ध् सोयी सुविधेमुळे दिव्यांग मुलांना त्यांच्या दिव्यांगत्वावर मात करण्यासाठी केंद्र चांगले प्रकारे उपचार पध्दती उपलब्ध् करुन देत असल्यामुळे पालकांचे मनोबल वाढले व केंद्रावरील सर्व डॉक्टर व त्यांची टिम यांच्या कार्याबद्दल कौतुक केले व उपस्थित दिव्यांग पाल्यांच्या पालकांच्या समस्याबाबत विचारपुस केली.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले पोलिस अधिक्षक निखील पिंगळे यांनी भविष्यात येणाऱ्या समस्यांचे निवारण करण्यासाठी सदरचे केंद्र हे चांगल्या प्रकारे काम करत असून त्याचा फार मोठा फायदा पोलिस यंत्रणेला होणार असल्याचे त्यांनी त्यांच्या मनोगतातून आपल्या भावणा व्यक्त केल्या.

तसेच सदरील कार्यक्रम यशस्विरित्या पार पाडण्यासाठी समाज कल्याण निरीक्षक कुंभार डी.जी., राजू गायकवाड वै.सा.का. समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद, लातूर व श्रीहरी गोरे व्यवस्थापक, अंगद महानुरे, समन्वयक, समग्र शिक्षा अभियान इत्यांदींनी प्रयत्न केला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजू गायकवाड वै.सा.का. यांनी केले.

Most Popular

To Top