महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – लातूर पोलिस दलातील चालक पोलिस शिपायांच्या 6 रिक्त पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली होती त्यातील 23 पात्र उमेदवार 26 व 27 ऑक्टोबर रोजी बाभळगाव रोडवरील पोलिस मुख्यालय येथे भरतीसाठी हजर झाले होते. 1600 मिटर धावणे व गोळाफेक या मैदानी चाचणीत 18 उमेदवार पात्र ठरले आहेत. तर 5 उमेदवार हे अपात्र ठरले आहेत. या भरती दरम्यान उमेदवारांची कागदपत्र पडताळणी, शारिरीक मोजमाप व शारिरीक चाचणी प्रक्रिया घेण्यात आली. मैदानी चाचणीत उमेदवारांना प्राप्त झालेल्या गुणांची तात्पूरती यादी लातूर पोलिसच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही चालक पोलिस भरती प्रक्रिया पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनात अत्यंत पारदर्शक पदध्तीने सुरु आहे. मैदानावर CCTV कॅमेरे असून व्हिडिओग्राफी करण्यात आली आहे.
उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये, तसेच कोणी वशीलेबाजी करण्याचा प्रयत्न करीत
असल्याचे आढळून आल्यास संबंधितांविरूद्ध कठोर कार्यवाही करण्यात येईल, असे पोलिस अधीक्षक
निखिल पिंगळे यांनी म्हटले आहे.
