लातूर मनपाला 10 वर्ष पूर्ण झाल्यामुळे एक महिना दशकपूर्ती महोत्सव साजरा होणार – महापौर विक्रांत गोजमगुंडे

महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर शहर महानगरपालिकेच्या स्थापनेस 10 वर्ष पूर्ण झाले आहेत . 25 ऑक्टोबर 2011 रोजी स्थापना झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वाटचालीत 10 वर्ष हा एक महत्त्वाचा टप्पा महापालिकेने पूर्ण केला आहे. शहराच्या विस्ताराबरोबरच विकासाच्या कक्षाही रुंदावत आहेत, त्यात नागरिकांचा सहभाग अत्यंत मोलाचा ठरला आहे. मागील 10 वर्षात लातूर शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आजवरच्या सर्व पदाधिकारी आणि नगरसेवक यांनी केला आहे. याकाळात अनेक विकास कामे पूर्णत्वास नेण्यात आली आहेत. तसेच अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. 10 वर्षाच्या काळात बहुतांश काळ दुष्काळ, कोरोना अशा मोठ्या संकटांचा सामना करावा लागला परंतु त्यातही महानगरपालिका यशस्वी होऊन मार्गक्रमण करत आहे . मनपाच्या दशकपूर्ती महोत्सवानिमित्त त्याला उजाळा देत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की 10 वर्षांच्या कालावधीत महानगरपालिकेला अनेक महापौर मिळाले त्यात काँगेस आणि भाजपचे महापौर होते . या सर्व महापौरापैकी कोणाचे कार्य शहराला प्रगतीकडे आणि शहरात विकास कामाची नांदी शहरात आणली तर सर्वात पहिले नाव लातूरकरांच्या तोंडून एकच नाव येईल ते म्हणजे महापौर विक्रांत गोजमगुंडे, लातूर शहरात वेगवेगळे उपक्रम राबून गोजमगुंडे यांनी लातूरकरांच्या समस्या सोडवण्याचे काम केले आहे. लातूरच्या इतिहासात प्रथमच महिलांना सिटीबस मोफत करण्याचा निर्णय असो वा शहराला 10 दिवसातून दोनदा पाणी देण्याचा, कोरीनाच्या कठीण काळात लातूरकरांच्या सेवेत कुठलीही अडचण येऊ दिली नाही. लातूरकर कोरोणाचा कठीण काळ आणि त्या काळातील विक्रांत गोजमगुंडे यांच्या कार्याला कधीही विसरणार नाही.

महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी लातूर शहर महानगरपालिकेला 10 वर्ष पूर्ण झाल्यामुळे दि. 25 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर या कालावधीत दशकपुर्ती महोत्सव साजरा केला जाणार आहे. या कालावधीत विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या आहेत. क्रीडा, शैक्षणिक तसेच कार्यालयीन स्पर्धा सोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांचीही रेलचेल असणार आहे. या काळात शहरातील महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीचे स्टॉलही उभे केले जाणार आहेत. मनपाचे पदाधिकारी अधिकारी व कर्मचारी तसेच शहरातील नागरिकांनी या महोत्सवात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी लातूरकरांना केले आहे. आणि समस्त लातूरकरांना महापालिका वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि महानगरपालिकेत केक कट करून साजराही केला.

Recent Posts