महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी करण्यात पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांना चांगलेच यश आले आहे. जिल्ह्यातील मटका, जुगार आड्डे, गुटका विक्री करणाऱ्यांना चांगलीच भीती बसवली आहे. आता तर निखिल पिंगळे यांच्या साथीला जिल्हा पोलिसात आणखी दोन IPS अधिकारी आले आहेत. गोलाईत सर्वात मोठी गुटक्यावर कारवाई झाल्याने गुटका माफिया चांगलाच हदरला आहे. पण आता लातूर पोलिसांसमोर आणखी एक आव्हान दिसत आहे ते म्हणजे क्रिकेट सट्टेबाज बुकी, T20 चे क्रिकेट सामने चालू झाले आहेत. लातूर शहरात काही बुकी क्रिकेटवर सट्टा घेत आहेत. गोलाई, MIDC भाग, सराफ लाईन अशा काही भागात हे बुकी बसलेले असतात! , हा सर्व व्यवहार मोबाईल वर होत आहे! यात अनेक तरुण अडकले जात आहेत.
