भारत

लातूरचे उच्चशिक्षित माजी खासदार डॉ.सुनील गायकवाड यांना अमेरिकन युनिव्हर्सिटी -USA ची Ph.D पदवी प्रदान

महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – लातूर हे शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. राज्यभरातून येथे विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात. लातूर म्हणजे शिक्षण हिच परंपरा वाढवण्याचे काम लातूरचे माजी खासदार प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांनी चालू ठेवले आहे असे दिसत आहे. काही दिवसापूर्वी त्यांनी योगा मधील सर्वात अवघड परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. आणि आता मुंबई येथे “द अमेरिकन यूनिवर्सिटी USA “ कडून डॉक्टर ऑफ फ़िलॉसाफ़ी (मेडिकल & पोलिटिकल साइयन्स) या विषयात Ph.D.( ऑनर्स) देऊन गौरव करन्यात आला. द अमेरिकन यूनिवर्सिटी-USA चे फ़ाउंडर अण्ड चेअरमन प्रोफ़ेसर डॉ मधु कृष्णन आणि मुंबई चे ख़ासदार डॉ गोपाल शेट्टी यांच्या हस्ते डिग्री प्रमाणपत्र, मेडल, स्मृतीचिन्ह देऊन गौरवन्यात आले.

पदवीदान समारंभास केंद्रीय मंत्री डॉ रामदास आठवले, प्रसिद्ध सिने अभिनेत्री उषा नाड़कर्नि, दादासाहेब फालके अवार्ड चे संस्थापक कल्याण जाना,आदि फ़िल्म जगतचे कलाकार मोठया संखेनी उपस्थित होते.
प्रोफेसर डॉ. सुनील बळीराम गायकवाड हे उच्च शिक्षित खासदार म्हणून 16 व्या लोकसभेत त्यांचं हाई रेंज बुक ऑफ वर्ल्ड रकॉर्ड मध्ये नोंद झालेली आहे. ते अनेक विषयांत पदवीत्तर शिक्षण घेतलेले आहेत. त्यांच्या अनेक सामाजिक आणि राजकीय कार्याची दखल घेऊन त्यांना पॉलिटिकल सायन्स विषयात द अमेरिकन युनिव्हर्सिटी USA नी ऑनर्स डॉक्टरेट डिग्री ( Ph.D) देऊन गौरव करण्यात आला . त्यांना मिळालेल्या गौरवासाठी त्यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आणि मित्र परिवाराकडून अभिनंदन होत आहे.

Most Popular

To Top