महाराष्ट्र

JSPM शिक्षण संस्थेचे अराईज इंटरनॅशनल स्कूल भोसरी पुणे येथे भव्य इमारतीचा उद्घाटन सोहळा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न

महाराष्ट्र खाकी (पिंपरी – चिंचवड) – लातूर पॅटर्नचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. लातूर जिल्ह्यात अनेक शिक्षण संस्थाच्या परिश्रमाणे हे यश लातूरला मिळाले आहे. लातूर पॅटर्न घडवण्यात मोलाचा वाटा माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या JSPM शिक्षण संस्थेचा आहे. लातूर तालुक्यातील कव्हा गावातून या शिक्षण संस्थेची सुरुवात शिवाजीराव पाटील कव्हेकरांनी वयाच्या 27 व्या वर्षी केली होती, चार विद्यार्थ्यांपासून सुरु झालेल्या JSPM शिक्षण संस्थेत आज 15 हजार विद्यार्थ्यां शिक्षण घेत आहेत. या शिक्षण संस्थेचे लातूर, कव्हा, रेणापूर, औरंगाबाद, आणि आता पुणे येथे मिळन 32 युनिट कार्यरत आहेत आणि साडे आठशे कर्मचारी कार्यरत आहे. लातूर पॅटर्नचे शिक्षण आता पुण्यात मिळणार आहे याचे सर्व श्रेय काम शिवाजीराव पाटील कव्हेकर यांना जाते. पुण्यात भोसरी आणि रावेत येथे JSPM शिक्षण संस्थे अंतर्गत अराईज इंटरनॅशनल स्कूल भोसरी येथील भव्य इमारतीचा उद्घाटन सोहळा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, आमदार महेशदादा लांडगे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला .
यावेळी माजी मंत्री गिरीशजी महाजन , आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर , आमदार लक्ष्मणराव जगताप , माजी आमदार विलासराव लांडे , महापौर उषाताई ढोरे, गटनेते एकनाथराव पवार , शिवाजीराव पाटील कव्हेकर , रणजितसिंह कव्हेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Most Popular

To Top