पोलीस

लातूर पोलीस दलातील काही pi आणि psi यांच्या बदल्या

महाराष्ट्र खाकी (लातूर) – सध्या महाराष्ट्र पोलीस दलात अधिकारी आणि अंमलदार यांच्या बदल्या होत आहेत. लातूर जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक(api) म्हणून कार्यरत असलेले संजय पवार, अनिल कुरुंदकर, गफार शेख यांची नांदेड जिल्ह्यात तर पोलीस उपनिरीक्षक(psi)अमोल गुंडे, विजय पाटील, नागोराव जाधव, प्रदीप गौंड, गणेश कदम, गजानन अन्सापुरे, दिनेश शिंगणकर यांची लातूर जिल्ह्यातून नांदेड जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. तर नांदेड जिल्ह्यातून सुरेश नरवाडे, राजाभाऊ जाधव यांची लातूर जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. आणि जिल्ह्यातील कार्यकाळ पूर्ण करणारे पोलीस निरीक्षक (pi)सुनील नागरगोजे यांची बदली परभणी येथे करण्यात आली आहे. नानासाहेब उबाळे, अनिल चोरमले यांची नांदेड जिल्ह्यात प्रशासकीय कारणावरून बदली करण्यात आली आहे.तर लातूर शहरातील गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय हिबारे यांची नांदेड येथे बदली करण्यात आली आहे. तर परभणी जिल्ह्यातून दीपक शिंदे, रामेश्वर तट आणि हिंगोली जिल्ह्यात कार्यरत असलेले अंगद सुडके, नांदेड जिल्ह्यात कार्यरत असलेले बालाजी मोहिते हे पोलीस निरीक्षक (pi)यांची लातूर जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी गुरुवारी आदेश जारी केले आहेत.

Most Popular

To Top