बैलगाडा मालकांवर आजपर्यंत दाखल झालेले गुन्हे लवकरच मागे घेतले जातील – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

महाराष्ट्र खाकी (पुणे) – कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे, त्याचा मोठा धोका राज्याला आहे. त्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये होणारी गर्दी चिंता वाढवणारी आहे. दोन वेळा डोस घेऊनही कोरोना होत आहे, त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी. लसीकरण आणि टेस्टिंगही वाढविण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत, असे वळसे पाटील यांनी या वेळी बोलताना म्हणाले.बैलगाडा मालकांवर आजपर्यंत दाखल झालेले गुन्हे लवकरच मागे
घेण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली. गुन्हे मागे घेणार म्हणून आगामी काळात कोणीही कायदा हातात घेऊन बैलगाडा शर्यती भरवू नये, अशी सूचनाही त्यांनी बोलताना केली. म्हणाले की, राज्यात बैलगाडा शार्यतींना बंदी असतानाही सांगलीत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडा शर्यती झाल्या. त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. बैलगाडा शर्यतबाबत राजकारण करण्याची कोणाचीही भूमिका नाही. त्या सुरू व्हाव्यात, यासाठी सर्व पक्षांचा पाठिंबा आहे. बैलगाडा शर्यतीच्या मर्यादा पाळून शर्यतीस परवानगी दिली होती. मात्र, बैलगाडा मालक त्याचे पालन करत नाहीत, त्यामुळे शर्यतींवर पुन्हा बंदी आली. सध्या हा प्रश्न पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे आहे. ते जोपर्यंत या प्रश्नावर निकाल देणार नाहीत, तोपर्यंत शर्यतींवरील बंदी उठणार नाही.

Recent Posts