महाराष्ट्र

श्री त्रिपुरा विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय व रिलायन्स डिफेन्स अकॅडमी मध्ये 75 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर येथील श्री त्रिपुरा विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय व रिलायन्स डिफेन्स अकॅडमी मध्ये हर्षल 75 वा स्वातंत्र्यदिन कर्नल सुशीलकुमार चव्हाण , संस्थेचे संस्थापक प्राध्यापक उमाकांत होनराव यांच्या उपस्थितीत उत्साहत साजरा करण्यात आला. लातूर पॅटर्नचे नाव राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्याचे काम लातूर मधील एक शिक्षण संस्था मागील 17 वर्षापासून प्राध्यापक उमाकांत होनराव यांच्या मार्गदर्शनात आणि संकल्पनेतून श्री संगमेश्वर चारीटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून करत आली आहे. श्री त्रिपुरा विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय लातूरमध्ये राष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देऊन विद्यार्थ्यांना डॉक्टर इंजिनियर करण्याचा ध्यास आणि उज्ज्वल यशाचा इतिहास निर्माण करत आहे .

श्री त्रिपुरा विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या यशानंतर प्राध्यापक उमाकांत होनराव यांचे आणखी एक स्वप्न म्हणजे लातूर मधील विद्यार्थी हा भारतीय सैन्य दलातील अधिकारी होऊन देशाची सेवा करावी यासाठी त्यांनी हा मानस रिलायन्स डिफेन्स अकॅडमीची सुरुवात केली आहे . प्राध्यापक उमाकांत होनराव यांच्या मार्गदर्शनात एक उच्य दर्जाची डिफेन्स अकॅडमी लातूर मध्ये निर्माण होत आहे हि लातूरकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे . रिलायन्स डिफेन्स अकॅडमी यावर्षी द्वितीय वर्षात पदार्पण केले आहे. रिलायन्स डिफेन्स अकॅडमी मध्ये एनडीए विद्यार्थ्यांचे शानदार परेड व चित्तथरारक कमांडो प्रात्यक्षिके सादर करून 75 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात करण्यात आला .या कार्क्रमाला कर्नल सुशीलकुमार, संस्थेचे संस्थापक प्राध्यापक उमाकांत होनराव, महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. सौ. केवलरम मॅडम, संस्थेच्या कोषाध्यक्ष मा. प्रेरणाताई होनराव , रिलायन्स लातूर पॅटर्नचे कार्यकारी संचालक श्री ओंकार होनराव व महाविद्यालयाचे सर्व विभाग प्रमुख ,विद्यार्थी व पालक उपस्थित होते. यावेळी कर्नल सुशीलकुमार चव्हाण बोलताना म्हणालेकी “भारतीय सैन्यदलातील संधी व प्रत्येक नागरिकाला आपल्या कर्तव्यातून देश सेवेची संधी नेहमीच असते ” आणि सर्वांनाच स्वतंत्रदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Most Popular

To Top