महाराष्ट्र

विलासराव देशमुख यांच्या पुण्यतिथी निमित्त रितेश देशमुख यांची मुलांचा फोटो शेअर करत केली खंत वेक्त

महाराष्ट्र खाकी (लातूर ) – 14 ऑगस्टला लातूरचे सुपुत्र महाराष्ट्राचे माझी मुख्यमंत्री काँग्रेस पक्षाचे नेते विलासराव देशमुख यांची पुण्यतिथी असते . 2012 ला विलासराव देशमुख यांचं निधन झालं. विलासराव देशमुख यांची जादू मात्र कायम लोकांच्या आणि राजकीय मंडळीवर दिसून येते. त्याच्या पुण्यथिती निमित्त संपूर्ण राज्य अभिवादन करते .विलासराव देशमुख यांचे चिरंजीव आणि अभिनेता रितेश देशमुखने आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीला नेहमीप्रमाणे वेगळ्या प्रकारे अभिवादन केलं . तर त्याच्या लहान मुलांनी ही आपल्या आजोबांना अभिवादन केलं. रितेश देशमुख दरवर्षी विलासराव यांच्या स्मृती दिनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करत असतो. वेगवेगळ्या पद्धतीने रितेश देशमुख आपल्या वडिलांच्या आठवणी जागवतो. या वर्षी एक व्हिडिओ देखील त्यानीं शेअर केला आहे.

मागील वर्षी ही असाच व्हिडिओ त्यानीं पोस्ट केला आहे . रितेश आणि संपूर्ण देशमुख कुटुंबाने या निमित्ताने विलासराव यांना अभिवादन केलं.लातूर जिल्ह्यातही अमित देशमुख, धिरज देशमुख यांनीही अभिवादन केले. रितेश देशमुख नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात . त्याच प्रमाणे त्यांनी एक इमोशनल पोस्ट देखील लिहिली आहे. मुलांसोबत फोटो शेअर करत त्यांनी खंत व्यक्त केली आहे. रितेश देशमुख आपल्या पोस्ट मध्ये लिहितात , ‘जर हे (मुलं) त्यांना भेटू शकले असते.दरम्यान रितेश देशमुख यांच्या दोन्ही मुलांचा जन्म विलासरावांच्या मृत्यूनंतर झाला होता. त्यामुळे त्यांची कधीही भेट होऊ शकली नाही. याचीच खंत त्याने व्यक्त रितेश देशमुख वडीलांप्रमाने राजकारणात नाहीत तरी आपल्या दोन्ही भावना म्हणजे लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख आणि लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख यांना सपोर्ट करण्यासाठी तो नेहमी तयार असतात .

Most Popular

To Top