महाराष्ट्र

लातूर जिल्ह्यातील कोणते साखर कारखाने ED च्या रडारवर आहेत ?

महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखानदारीत कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झालेले
अहित अशा चर्चा होत आहेत आणि सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मामानी विकत घेतला होता आता ED या बद्दल चौकशी करू सकते अशा चर्चा राज्यात सुरु आहेत. तोच लातूरचे माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनीही आरोप केले आहेत की लातूर जिल्ह्यातील दोन साखर कारखाण्या बद्दल ED चौकशी करू शकते. लातूर जिल्ह्यातही कारखानदारीत असंख्य घोटाळे असून यातून बरेच काही उघडकीस
येणार असून शेतकऱ्यांच्या पैशावर ज्यांनी हात टाकला त्याचे चेहरे उघडे पडतील, असा गौप्यस्फोट लातूरचे माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला आहे.

” जिल्ह्यातील 4 साखर कारखान्याना आता डीस्टीलरी (मद्य निर्मिती) प्रकल्पा साठी 276 कोटी रुपये जिल्हा बँकेकडून मिळणार आहेत.आणि दुसरीकडे जिल्ह्यातील 2 साखर कारखान्यांची साखर जप्त करण्याचे आदेश दिले आहेत ! 1) पानगेश्वर साखर कारखाना आणि 2) साईबाबा शुगर एकीकडे ही अवस्था आहे आणि आता केंद्र सरकारच्या प्रोत्साहन योजनेच्या अंतर्गत साखर कारखान्याच्या (आसवणी) डीस्टीलरी म्हणजे मद्य निर्मिती प्रकल्पा च्या उभारणीसाठी जिल्ह्यातील 4 साखर कारखान्यास लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने 276 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले असल्याची माहिती राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी जिल्हा बँकेचे मार्गदर्शक दिलीपरावजी देशमुख यांनी दिले आहेत. “

सहकाराचा स्वाहाकार करुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी लातूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या पैशावर उभे असलेले सहकारी साखर कारखाने अत्यंत कवडीमोल किमतीने खरेदी केलेले अहित.हे कारखाने आता ईडीच्या रडारवर आले आहेत.या कारखान्यांना लवकरच चाप लागणार आहे, असे संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले. शेतकऱ्यांच्या नावावर शेतकऱ्यांचे शेअर्स (पैसा)घेवून सहकारी कारखाने उभे करण्यात आले.ते
दिवाळखोरीत काढले आणि वैयक्तत्रक जहागिरी असल्याप्रमाणे कवडीमोल किंमतीत विकत
घेतले. ते विकले, ही अत्यंत गंभीर बाब आहे. सहकाराच्या नावावर स्वाहाकार करुन शेतकऱ्यांना लुटण्याचे, लुबाडण्याचे पाप त्यांनी केले आहे. ते आता उघडे पडणार आहे. लातूर जिल्ह्यात अहमदपूर व उदगीर तालुक्‍यातील साखर कारखाने चुकीच्या पद्धतीने खरेदी केले


आहेत . ते आता उघडे पडतील.खऱ्या अर्थाने पुतना मावशीचे प्रेम असणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे
नेते उघडे पडतील, असा विश्‍वास माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केला
असून लातूर जिल्ह्यातील हे दोन्ही कारखाने ED च्या रडारवर आहेत.सहकारातून कूटूंबाची समृद्धी, कूटुंबाचा विकास झाला आहे. स्वत:ला सहकार सहर्षी, सहकार सप्राट असे ही मंडळी म्हणवून घेते. ते नेते कशा पद्धतीने शेतकऱ्यांना लुटत आहेत ते सुद्धा या माध्यमातून उघडे पडेल, असेही माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Most Popular

To Top