महाराष्ट्र खाकी (चाकूर) – लातूर रोड येथील एका जवानाच्या घरावर दि 29/6/2021 मंगळवारी पहाटे दरोडा पडला होता त्याची चर्चा आणि तपास चालूच असताना लातूर रोड येथे आणखीन एक दरोडा पडला आहे.या दरोड्याच्या घटनेने पोलिसांबद्दल नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. लातूर रोड येथील सोपान पितांबर नरहरे हे त्यांची पत्नी लेकरांसह , दि 3/7/2021 शनिवारी सकाळी 10 ते 11 वाजण्याच्या सुमारास शेतात कामासाठी गेले होते. तासभराने सोपान नरहरे हे पाणी पिण्यासाठी घराकडे आले. तेव्हा घराच्या दाराचे कुलूप तोडून खाली पडलेले दिसले, तसेच बेडरूममधील लोखंडी कपाटाचे दारही उघडले दिसले. त्यामुळे त्यांनी पाहिले असता, त्यातील तीन तोळ्यांचे सोन्याचे गंठण, सात ग्रॅमचे मंगळसूत्र, 6 ग्रॅमचे कानातील झुमके आणि रोख 2 हजार रुपये असा 92 हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी पळविल्याचे दिसून आले. चोरट्यांनी नरहरे परिवारावर पाळत ठेवून चोरी केली आहे. असे प्रथमदर्शी दिसून आले
या दरोड्याच्या घटनेवरून नरहरे यांच्या तक्रारीवरून चाकूर पोलिसांत कलम 454, 380 भादंविनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच, उपविभागीय पोलीस अधिकारी DYSP बलराज लंजिले, पोलीस निरीक्षक सोपान सिरसाट, सहायक पोलीस निरीक्षक नलिनी गावडे, पोलीस उपनिरीक्षक खंडू दर्शने , पोहेकॉ.मारोती तुडमे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली, आणि पंचनामा केला. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी ठसे तज्ज्ञांना बोलावले होते, तसेच दिवसा झालेल्या या चोरीमुळे स्थानिक गुन्हा शाखेची पोलिसांनी LCB घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.