विनयभंगाचा आरोप असलेल्या गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ याला कोन घालतय पाठीशी ?

महाराष्ट्र खाकी (सातारा) – खासगी असो वा सरकारी ऑफिस किंवा कामाच्या ठिकाणी महिला असुरक्षित होऊ नये म्हणून सामाजिक संस्था आणि सरकार प्रयत्नशील आहे. काही महिन्यापूर्वी वनरक्षक खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून महिला अधिकारी यांनी आत्महत्या केली होती. आणि आता सातारा तालुक्‍यात कार्यरत असलेल्या शिक्षिकेने गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ याच्याविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दखल केली होती. यानुसार संजय धुमाळ याला ताब्यात घेत अटकची मागणी करण्यात आली होती.संजय धुमाळ याने प्रकृतीबाबतची तक्रार नोंदवली. यानुसार धुमाळ
याला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल
करण्यात आले. दि 28/06/2021 सोमवारी त्याची प्रकती चांगली असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर पोलिसांनी त्याला
ताब्यात घेतले. गटशिक्षणाधीकीरी संजय धुमाळ याला ताब्यात घेतल्या नंतरही प्राथमिक शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांना माहिती देण्यात आली नव्हती. ही माहिती दि 28/06/2021 सोमवारी समजल्यानंतर त्यांनी शिक्षण विभागाची बैठक बोलावत सर्वाना फैलावर घेतले. महिला शिक्षिकेने आपली तक्रार सुरवातीला प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांच्याकडे केली. कोळेकर यांनी तक्रारीच्या अनुषंगाने चौकशीसाठी ही तक्रार विशाखा समितीच्या अध्यक्षा गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण यांच्याकडे पाठवली. विशाखा समितीच्या अहवालाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी संबंधितांना विचारणा केली. त्यावर सकारात्मक उत्तर न मिळाल्याने त्याची चौकशी करून त्याचा तत्काळ अहवाल देण्याचे आदेश विनय गौडा यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांना दिले आहेत.
या सर्व प्रकरणात प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर आणि विशाखा समितीच्या अध्यक्षा गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण यांच्या कार्यवाही आणि कारवाईवर संशय वेक्त केला जात आहे ! एक महिला दुसऱ्या महिलेच्या मदतीला येताना दिसत नही हे दुर्दैव आहे अशी चर्चा सध्या जिल्ह्यात चालू आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास सातारा तालुक पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक अभिजित धुमाळ करीत आहेत.

Recent Posts

कुटुंबातील आणि मित्र परिवारातील प्रत्येक मतदाराला 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदानासाठी प्रोत्साहित करावे – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर – घुगे