महाराष्ट्र खाकी (रेणापूर) – लातूर जिल्ह्यात सध्या श्रेय वादाचे राजकारण चालू आहे. राजकीय नेत्यांनी एकमेकांवर श्रेय लाटण्याचा आरोप प्रतिरोप चालू आहेत. मे महिन्यात जिल्ह्याला कमी पडलेला ऑक्सिजन पुरवढा पालकमंत्री अमित देशमुख यांनी पुरवला आणि खासदारांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न केला असा आरोप लातूर काँग्रेसने केला होता. आणि आता रेणापूर तालुका भाजपा कडून लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांच्यावर केला आहे.लातूर ग्रामीण मतदारसंघातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील सलगरा बु. – दगडवाडी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ लातूर ग्रामीण चे आमदार धीरज देशमुख यांनी केला व दगडवाडी येथील पाझर तलाव दुरुस्तीच्या कामाची पाहणीही केली. ही कामे दर्जेदार व्हावीत, अशा सूचना यावेळी त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला सरकारच्या काळात भाजपा नेते रमेशअप्पा कराड यांच्या प्रयत्नातून मंजूरी मिळालेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा लातूर ग्रामीणच्या काँग्रेस आमदाराकडून केविलवाणा प्रयत्न होत असून त्यांनी निवडूण आल्या नंतर कोणत्या कामासाठी किती निधी मंजूर करून आणला ते आगोदर जनतेला सांगावे असा प्रश्न सर्वसामान्य मतदारातून उपस्थित केला जात आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सरकारच्या काळात तत्कालीन पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याच्या तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमातून भाजपाचे नेते आ. रमेशअप्पा कराड यांनी लातूर ग्रामीण
विधानसभा मतदार संघातील अनेक गावागावात, वाडी तांड्यातील विविध विकास कामासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, २५/१५ मुलभूत सोयीसुविधा विकास योजना यासह विविध योजनेच्या माध्यमातून मुख्य रस्ते, पूल, गावअंतर्गत नाली, रस्ते, समाज मंदिर आदी विकास कामासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी वेळोवेळी पाठपुरावा करून मंजूर करून आणला. लातूर तालुक्यातील सलगरा बु. ते दगडवाडी या रस्त्याच्या कामासाठी ११ जून २०१९ रोजीच्या शासन परिपत्रकानूसार १ कोटी ४४ लक्ष रुपयाचा निधी तर मौजे बामणी गावालगतच्या पूलाच्या कामासाठी २८ जून २०१८ रोजीच्या शासन परिपत्रकानूसार १ कोटी ८० लक्ष रुपयाचा निधी तत्कालीन राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्याकडून मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत भाजपाचे नेते आ. रमेशअप्पा कराड यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून निधी मंजूर करून आणला होता. सदरील भाजपा सरकारच्या काळात मंजूर झालेल्या कामाचे श्रेय लाटण्यासाठी लातूर ग्रामीण मतदार संघातील काँग्रेस आमदार महोदयांनी १५ जून २०२१ रोजी सदरील दोन्ही कामाचा शुभारंभ केला. सत्येचा वापर करून भाजपा सरकारच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न करणार्या आमदार महोदयांनी निवडूण आल्यानंतर कोणत्या कामासाठी विकास निधी आणला हे आगोदर जनतेला सांगावे असा प्रश्न भाजपाचे तालुकाध्यक्ष बन्सी भिसे, पांडुरंग बालवाड, राम बंडापल्ले, हणुमंत गव्हाणे, प्रताप पाटील, अशोक बिराजदार, सुरेश पाटील, संजय ठाकूर, अॅड. सतिश बिराजदार, मारुती शिंदे यांच्यासह मतदार संघातील सर्वसामान्य मतदारातून उपस्थित केला जात आहे. एकंदरीत सत्ताधारी पक्षाचा आमदार असतानाही ग्रामीण जनतेच्या हिताचे आणि विकासाचे प्रश्न सहजतेने सुटतील अशी अनेकांची अपेक्षा फोल ठरली.