लातूर जिल्हा

आमदार धिरज देशमुख यांचे मतदारसंघात विकास कामाचा सपाटा सुरूच

महाराष्ट्र खाकी (लातूर ग्रामीण) – लातूर जिल्ह्यात जी विकासाची गंगा आली आहे त्याचे श्रेय देशमुख परिवाराला जाते यात काही शंका नाही. लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख यांनी लातूर ग्रामीणचा विकास दूरदृष्टी ठेऊन विकास कामे केली आहेत. जसे विलासराव देशमुख यांनी राज्याचा आणि लातूरचा विकास केला तसा. लातूर ग्रामीण मतदारसंघातील भातांगळी येथे लातूर जिल्हा बँकेच्या सहकार्याने उभारलेल्या विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या गोडाऊनचे लोकार्पण आज लातूर ग्रामीण चे लोकप्रिय आमदार धीरज देशमुख साहेब यांनी केले. तसेच, आमदार फंडातून दिलेल्या विंधन विहिरीचे व आरओ प्लाँटचे भूमिपूजन करून त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. शेतकऱ्यांसाठी सोईसुविधा गावातच निर्माण केल्याने शेतकऱ्यांची चांगली सोय होईल, असा विश्वास याप्रसंगी त्यांनी व्यक्त केला. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी योग्य ती खबरदारी घ्यावी व यापुढेही आरोग्यविषयक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही आमदार धिरज देशमुख यांनी केले.

Most Popular

To Top