महाराष्ट्र खाकी ( लातूर) – लातूरचे नाव शिक्षण शिक्षण क्षेत्रात आपला वेगळाच ठसा उमटवला आहे. तसेच लातूरचे नाव सोयाबीन लागवडीत ही लातूर पॅटर्न निर्माण करत आहे. लातूर जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टर म्हणजे सव्वा अकरा लाख ऐकर सोयाबीनची लागवड होते. लातूर सोयाबीच्या लागवडीत देशात दुसरा आणि राज्यात पहिला क्रमांक आहे. या आणखीन एक भर पडणार असे दिसून येत आहे कारण लातूरचे माजी जिल्हाधिकारी तथा राज्याचे कृषी विभागाचे सचिव एकनाथजी डवले हे लातूर जिल्हा दौऱ्यावर आले असतांना त्याची भेट घेतली यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी उपस्थित होते
जिल्ह्यात सोयाबीनचे पेरणी क्षेत्र उत्पादन व त्यावर आधारित उद्योग मोठ्या प्रमाणावर आहेत.
तरि येथील कृषी महाविद्यालयाच्या परिसरात सोयाबीन संशोधन केंद्र उभे करण्याची सूचना पालकमंत्री अमित देशमुख यांनी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांना लातूर येथील भेटी वेळी केली. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणि सोयाबीन वर आधारित उद्योगानां चालना मिळेल.
कीर्ती ऑइल मिल, टिना ऑइल मिल या लातूर जिल्ह्यातील प्रमुख कंपन्या आहेत.
