राजकारण

देशमुख बंधूनी केलेल्या कामाचे श्रेय भाजप लोकप्रतिनिधी घेत आहेत का ?

महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर जिल्ह्यात श्रेयवादाची लढाई दिसून येत आहे. सध्या लातुरात देशमुखांच्या कामाचे श्रेय भाजपा लोकप्रतिनिधी घेत आहेत असे दिसून येत आहे ! केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी लातूर ग्रामीण मतदारसंघातील रस्त्यांबाबत लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख यांनी केलेल्या मागणीची दखल घेऊन नितीन गडकरी यांनी लातूर ग्रामीण मतदारसंघातील सारसा, गादवड, शिराळा, बोरगाव काळे, निवळी, कोंड रोड या मार्गासाठी 14.91 कोटी आणि माटेफळ-खंडाळा-गोंदेगाव, रामेगाव-ढाकणी-भेटा या रस्त्याच्या सुधारणेसाठी 4.95 कोटी मंजूर केले. याबद्दल आमदार धिरज देशमुखांनी ट्विटर आणि फेसबुकच्या माध्यमातून आभार मानले आणि याची माहिती जनतेला दिली. पण दुसऱ्या दिवशी एका व्रत्तपत्रात हा रस्तेविकास निधी विधानपरिषदेचे आमदार रमेशआप्पा यांच्या प्रयत्नामुळे मिळाला अशी बातमी आली. पण रमेशआप्पा कराड यांनी आपल्या कुठल्याच समाजमाध्यमाद्वारे हि गोष्ट जनतेला कळवली नाही की नितीन गडकरीचे आभार मानले नाहीत असे साध्यतरी दिसून येत आहे!

लातूरला ऑक्सिजन पुरवल्याचा वाद

दुसरीकडे लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी काही दिवसापूर्वी लातूर साठी ऑक्सिजन टँकर अर्जंट पुरवला असे फेसबुकच्या माध्यमातून पारसिद्ध केले होते. पण ते ऑक्सिजन टँकर आणि ती पोस्ट दोन्ही खासदार यांच्या मेहनतीने किंवा प्रयत्नाने झाले नव्हते अशी चर्चा लातूर मध्ये जोरात चालू आहे. ऑक्सिजन टँकर पालकमंत्री अमित देशमुख यांच्या प्रयत्नामुळे मिळाले असे लोक म्हणत आहेत. आणि लातूर भाजपा शहर जिल्हा संघटक सरचिटणीस यांनी एका व्हिडिओत हि म्हणाले. खासदारांनी जी पोस्ट केली तीही खासदार सुधाकर शृंगारे यांनी कॉपी करून फक्त अमित देशमुखांचे नाव काडून जशास तशी कॉपी केली असा आरोप काँग्रेसचे मीडिया प्रमुख प्रवीण सूर्यवंशी यांनी एक पोस्ट करून केला होता.
लातूर जिल्ह्यातील भाजपाचे लोकप्रतिनिधी देशमुखांनी केलेल्या कामाचे श्रेय का घेत असतील अशी चर्चा सध्या जिल्ह्यात आहे.

Most Popular

To Top