Uncategorized

सातारा पोलिसांच्या सेवेत 24 वाहनं आणि 48 मोटारसायकली पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते सुपूर्द

महाराष्ट्र खाकी ( सातारा ) – सातारा पोलिसांच्या वाहणाच्या ताफ्यात आणखीन वाहनांची वाढ जिल्हा नियोजच्या निधीतून प्रत्येक पोलीस स्टेशनला नवीन वाहन देण्यात आले आहे. विविध प्रकारचे 24 वाहनं आणि 48 मोटार सायकली याच्यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास मोठी मदत होणार आहे. जिल्हा नियोजन निधीमधून पोलीस विभागासाठी वाहने खरेदी करण्यात आली आहेत. ही वाहने पोलीस विभागाला पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई खासदार श्रीनिवास पाटील, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील आदी उपस्थित होते.


पोलीस विभागातील अनेक वाहने जुनी झाली होती. जिल्हा नियोजनच्या निधीमधून 13 स्कॉर्पिओ, 5 बलोरो, 6 व्हॅन व 48 मोटार सायकली पोलीस विभागास देण्यात आली आहेत. या वाहनांचा बंदोबस्तासाठी मोठा उपयोग होणार असून कायदा व सुव्यवस्था राखण्यास मोठी मिदत मिळणार असल्याचेही पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
पोलीस विभागातील वाहने जुनी झाली होती. कायदा व सुव्यास्था राखण्यासाठी जिल्हा नियोजनमधून साडेतीन कोटी रुपये वाहनांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले होते. या वाहनांचा पोलीस विभागामार्फत योग्य उपयोग करुन पोलीसांमधील कार्यक्षमता व गतीमानता वाढणार असून, हा निधी मंजुर केल्याबद्दल लोकप्रतिनिधींचे आभार गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी मानले.

Most Popular

To Top