महाराष्ट्र

जे पालकमंत्र्याना सुचल नाही ते पश्चिम बंगाल निवडणूक प्रचार करून आलेल्या अभिमन्यू पवारांना सुचल!

महाराष्ट्र खाकी (लातूर) – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लाडके असलेले औसा आमदार अभिमन्यू पवार हे आपल्या मदरसंघात वेगवेगळ्या योजना राबवत असतात आणि नाव नवीन विकासकामे घेऊन येत असतात. शेत रस्ता निर्मिती मध्ये राज्यात औसा पॅटर्न निर्माण करणारे आमदार अभिमन्यू पवार पश्चिम बंगाल मधील निवडणूक प्रचार करून त्यांनी आपली नजर कोविड 19 उपाययोजना आणि लातूर येथे 500 – 100 बेड्स चे जम्बो कोव्हीड हॉस्पिटल सुरु करा तसेच लामजना, कासार सिरसी व मदनसुरी येथे कोव्हीड केअर सेंटर सुरु करा आणि औसा येथील कोव्हीड केअर सेंटर हे कोव्हीड डेडिकेटेड हॉस्पिटल म्हणून दर्जोन्नत करा अशी मागणी आज जिल्हाधिकारी श्री पृथ्वीराज बी पी यांच्याकडे केली आहे.

औसा आणि निलंगा तालुक्यात प्रत्येकी एकच कोव्हीड केअर सेंटर आहेत व त्या दोन्ही सेंटरची क्षमता वाढत्या रुग्ण संख्येपुढं तोकडी पडत आहे. ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांमध्ये होम आयसोलेशनसाठी आवश्यक ती व्यवस्था नसते, अशात घरातील कोणाला कोरोनाची लागण झाली तर पूर्ण कुटुंबालाच संसर्गाचा धोका वाढतो. वाढत्या रुग्णसंख्येला इन्स्टिट्यूशनल आयसोलेशन ची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लामजना, कासार सिरसी व मदनसुरी येथे नवीन कोव्हीड केअर सेंटर सुरु करा तसेच औसा येथील कोव्हीड केअर सेंटर हे कोव्हीड डेडिकेटेड हॉस्पिटल म्हणून दर्जोन्नत करा अशी मागणी आज लातूरचे जिल्हाधिकारी श्री पृथ्वीराज बी पी यांच्याकडे फोनवर सविस्तर चर्चा करून तसेच निदेणाद्वारे केली आहे.

कोव्हीड केअर सेंटर मधील अत्यवस्थ रुग्णांना लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बेडसाठी रुग्णवाहिकेसह ताटकळत उभे राहावे लागत असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आणून देत लातूर येथे ऑक्सिजनसह इतर सर्व आवश्यक सुविधा असलेले ५०० – १००० बेड्स चे तात्पुरत्या स्वरूपाचे जम्बो कोव्हीड हॉस्पिटल सुरु करण्यात यावे अशीही मागणी त्यांच्याकडे केली. कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे त्यामुळे लवकरात लवकर हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर वाढवणे गरजेचे आहे.

Most Popular

To Top