महाराष्ट्र खाकी (लातूर ) – कोरोनाचा वाढता संसर्घ पाहता राज्य सरकारने 1 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. सर्व पालकमंत्री आपल्या जिल्ह्याचा आढावा घेत आहेत. लातूर जिल्ह्यचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी लातूर जिल्ह्यातील काही भागाचा आढावा घेतला आहे. जनतेची गैरसोय होऊनये म्हणून जिल्हाधिकारी आणि इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. विशेष म्हणजे अमित देशमुख यांची जनतेप्रतीची काळजी दिसून आली. त्यांच्या सूचनेमध्ये जिल्ह्याविषयी दूरदृष्टी दिसून आली. लोकांमध्ये तर अशीही चर्चा होतीकी विलासराव देशमुख ज्या पद्धतीने, आत्मीयतेने जिल्ह्याची काळजी घेत त्याच पद्धतीने अमित देशमुख हेही काळजी घेत आहेत. बऱ्याच लोकांना विलासराव देशमुख यांची आठवण झाली. पालकमंत्री अमित देशमुख यांच्या या दौऱ्यातून विलासराव देशमुख यांचा जनसेवेचा वारसा समर्थपणे चालवत आहेत असे दिसून येत आहे.
चाकूर येथील कोविड केअर सेंटर रुग्ण उपचार सोयी सुविधांचा आढावा.
कोविड19 मुक्त गाव अभियान राबविण्यात यावे
तालुक्यात 100 बेड रुग्णालय करीता प्रस्ताव सादर करावा
जिल्ह्यातील चाकूर इथल्या कृषी महाविद्यालय कोविड केअर सेंटरची पाहणी करून तेथील कोविड19 प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांना उपलब्ध आरोग्य सुविधा आणि केल्या जात असलेल्या उपाययोजना याची पाहणी करून माहीती घेतली. आजघडीला चाकूर तालुक्यात 864रुग्ण उपचार घेत असून तालुक्यात 24 ठिकाणी रुग्ण तपासणी केली जात आहे.
पालकमंत्री ना. अमित देशमुख यांनी चाकूर तालुक्यातील रुग्ण तपासणी संख्या कमी असून तपासणीचा वेग सध्याच्या तपासणीच्या तुलनेत दहा पट अधिक वाढवावा, परवानगी नसताना व्यवसाय करणाऱ्यावर कारवाई करावी, तालुक्याच्या ठिकाणी किमान 100 बेड रुग्णालय असावे याकरीता प्रस्ताव तयार करावा, कोरोना19 मुक्त गाव अभियान राबवून शासनस्तरावर पुरस्काराने सन्मान असा उपक्रम राबवावा, एकूण बाधित रुग्णांची विविध घटकातील वर्गवारी काढून त्या त्या घटकात जनजागृती करावी, 25 रुग्णांच्यावर रुग्ण असलेल्या गावात संस्थात्मक विलगिकरण सुरू करण्यात यावे, अशा सूचना पालकमंत्री ना. अमित देशमुख यांनी यावेळी संबंधित आरोग्य अधिकारी व तालुका अधिकारी यांना दिल्या.
अहमदपूर येथील ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन येथील कोविड केअर सेंटरमधील सोयी-सुविधांचा आढावा घेतला.
साध्या व ऑक्सिजनयुक्त बेडची संख्या वाढवावी, औषधे व इतर आवश्यक साहित्यांची मागणी नोंदवावी, त्याची तातडीने पूर्तता करण्यात येईल असे आश्वासन दिले.
तसेच अहमदपूर तालुक्यात लसीकरणाची गती वाढवावी, कोरोना बाधितांच्या संपर्कातील लोकांच्या अधिकाधिक तपासण्या कराव्यात, आवश्यकतेनुसार गावोगावी संस्थात्मक विलगीकरण केंद्र उभारावीत, रुग्णांवरील उपचारात तत्परता दाखवण्याचे निर्देश देऊन लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे त्यांनी सूचित केले.तसेच कोरोनाला प्रतिबंध घालण्यात सर्वांचा सक्रिय सहभाग लाभावा या उद्देशाने कोरोनामुक्त गाव अभियान राबवावे असे सूचित केले. यात यशस्वी ठरणाऱ्या गावांना प्रोत्साहनपर विकास निधी देण्यात येईल अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली .
मुरुड ग्रामीण रूग्णालय कोवीड१९ उपचार सुविधेचा आढावा
मुरुड येथील रुग्णांचे होम आयसोलेशन बंद करण्यात यावे
• आरोग्य यंत्रणेत खाजगी डॉक्टरासह मनुष्यबळ वाढवावे
• कोवीड१९ नियंत्रणासाठी तालुका प्रशासन व आरोग्य विभागास केल्या विविध सुचना मुरुड ग्रामीण रूग्णालयातील रुग्ण, उपचार सुविधा, रेमडीसिविर इंजेक्शन, लॉकडाऊन परिस्थिती, कायदा व सुव्यवस्था यासह अन्य आवश्यक आरोग्य सेवा सुविधांचा पाहणी करून आज शुक्रवार दिनांक 16 एप्रिल रोजी आढावा घेतला आणि कोवीड19 प्रादूर्भाव रोखण्यासाठी संबंधित यंत्रणेला विविध सुचना केल्या.
सध्या लातूर तालुक्यातील मुरुड आणि परीसरातील गावांमध्ये कोवीड19 प्रादूर्भाव वाढला आहे. मुरूड येथेच जवळपास 204 रुग्ण उपचार घेत आहेत. मुरूड येथील ग्रामीण रुग्णालयातील कोविड19 उपचार सुविधेचा आणि सर्व आरोग्य सेवांची पाहणी करून पालकमंत्री देशमुख यांनी आढावा घेतला. मुरूड येथे पॉझिटिव्ह रेट जवळपास 30 ते 40 टक्केच्या घरात आहे. येथील कोवीडरुग्ण होम आयसोलेशनचे पालन करीत नसल्याने कोविड बाधितांचे प्रमाण वाढत आहे. यामुळे मुरुड येथील रुग्णांचे होम आयसोलेशन बंद करण्यात यावे, सरकारी कोविड हॉस्पिटलसाठी शासकीय यंत्रणे बरोबर मुरुड मधील खाजगी डॉक्टर मंडळींना व पालिकेचे मनुष्यबळ सेवेत घ्यावे, अशा सूचना जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन व आरोग्य विभागास ना. अमित देशमुख यांनी यावेळी दिल्या.
लातूर M.I.M.S.R वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड उपाययोजनाचा घेतला आढावा.
• ऑक्सिजनेटेड बेडची संख्या 400 पर्यंत वाढवावी
• व्हेंटिलेटर बेडची संख्या वाढवावी
• ऑक्सिजन तसेच औषधांचा पुरवठा केला जाईल
• मनुष्यबळही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न होईल सायंकाळी लातुर शहरातल्या M.I.M.S.R.वैद्यकीय महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन तेथील कोविड19 रुग्णालयात करण्यात येत असलेल्या उपचाराचा आणि सोयीसुविधाचा आढावा घेतला.
सध्या लातूर आणि परिसरात कोविड19 चा वाढता प्रादुर्भाव आणि रुग्ण संख्या दिवसेंदिवस होत असलेली वाढ लक्षात घेऊन या रुग्णालयातील बेडची संख्या वाढवावी ऑक्सिजनेटेड बेडची संख्या किमान 400 पर्यंत वाढवावी व्हेंटिलेटर बेडची संख्या वाढवावी आदी सूचना करून या रुग्णालयासाठी ऑक्सीजन तसेच औषधांचा तुटवडा जाणवणार नाही याची हमी दिली. मॅनपावर ही उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगितले.