महाराष्ट्र खाकी (लातूर) – कोरोना संसर्घ वाढत असल्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागू केला आहे. पण काही निष्काळजी लोक बाहेर बिनधास्त बाहेर फिरत आहेत. लातूर शहरातील विवेकानंद चौक पोलीस स्टेशन हद्दीत माॅर्निग वाॅक करणारे 32 पुरुष व 16 महीला असे 48 जन यांना पोलीस स्टेशन येथे आणून 8600/- रूपये दंडात्मक कारवाई केली. व सर्वांची अँटीजन टेस्ट केली असता त्यात एक पुरूष व एक महिला कोरोना पॉजिटीव्ह आले असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी अँब्यूलन्स बोलावून समाजकल्याण येथे पाठवले आहे.अशीच कारवाई लातूर शहरातील विवीध पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस प्रशासन आणि मनपा यांनी संयुक्त कारवाई करत आहेत तरी लोकांना परिस्थितीचे गांभीर्य दिसत नाही.
ही कारवाई लातूर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, DYSP जितेंद्र जगदाळे यांच्या सूचनेने विवेकानंद चौक पोलीस स्टेशनचे निरीक्षक विकास तिडके, PSI सिता वाघमारे, PSI शंकर मोरे , Asi सय्यद, Asi देवकते, मुरूळे, गुंठे, भुजबळ, इंगोले, पुरी, शेलगे यांचे सह म.न.पा.चे दोन कर्मचारी व अँटी जेन टेस्ट करणारा स्टाफ सह कार्यवाही केलेली आहे. आदी पोलीस कर्मचारी यांनी केले आहे. लातूर शहरातील आज सकाळी सर्व पोलीस स्टेशन व आरोग्य विभाग यांनी संयुक्तरीत्या, मॉर्निंगवॉक करण्यास रस्त्यावर निघालेल्या 136 लोकांना थांबवून त्यांची ऑंटीजेन टेस्ट करण्यात आली त्यापैकी 03 जण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांना CCC येथे शिफ्ट करण्यात आले आहे.