देश

लातूर पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे, हिम्मत जाधव सर्व अधिकाऱ्या सोबत कोरोनाबाबत आवाहन करण्यासाठी उतरले रस्त्यावर

महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर जिल्ह्यात कोरोनाची लाट आलीकी काय असे म्हणावे लागते आहे आहे असे दिसून येत आहे. दिवसेन दिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहे आकडा कमी होण्याचे चिन्ह दिसत नाहीत आणि लातूरचे लोक कोरोना बाबतीत गंभीर दिसत नाहीत कारण जिल्हा प्रशासन वारंवार सूचना देत आहे पण या सूचनेचे पालन करण्यात लोक कमी पडत आहेत असे दिसून येत आहे. म्हणून लातूर पोलीस प्रशासनाकडून स्वतः पोलीस अधीक्षक निखील पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव आणि शहरातील सर्व पोलीस स्टेशनचे अधिकारी आज 31/03/2021 बुधवार रोजी सायंकाळी लातूर शहरातील मुख्य बाजारपेठेत जाऊन लोकांना आणि व्यापाऱ्यांना मास्क वापरण्याचे आणि गर्दी टाळण्याचे आवाहन आणि सूचना देत आहेत.

शहरात मनपा आणि पोलीस यांच्या कडून बिना मास्क फिरणाऱ्या लोकांना दंड चालू केला आहे पण लोक काही नियम पळत नाहीत असे दिसून येत आहे. म्हणून पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे साहेब, अपर पोलीस अधिक्षक हिम्मत जाधव व शहरातील सर्व पोलीस ठाण्याचे अधिकारी हे शहरात कोरोनाबाबत आवाहन करताना दिसून आले. आता तरी लातूरकरांनो सावध व्हा आणि विनाकारण बाहेर फिरू नका, मास्क वापरा, गर्दी टाळा असे आवाहन लातूर पोलीस अधीक्षक निखील पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी केले आहे.

Most Popular

To Top