लातूर जिल्हा

लातूर जिल्हयातील महानगरपालिका, नगरपालिका,नगरपंचायत क्षेत्रात 4 एप्रिल पर्यंत नवी नियमावली जाहिर.

महाराष्ट्र खाकी (लातूर) – जिल्ह्यात मागली काही दिवसात कोव्हिड-19 रूग्णांमध्ये लक्षणिय वाढ होत असल्याचे निर्दशनास येत आहे. कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्कम उपाययोजना करणे आवश्यक आहे.यामध्ये काही अतिरिक्त निर्बध लावणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण चे अध्यक्ष बी.पी पृथ्वीराज यांनी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा-1897 आपत्ती व्यवस्थापन अधिनियमन-2005 व फौजदार प्रक्रीय संहिता-1973 चे कलम -144 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून लातूर जिल्हयातील महानगरपालिका/ नगरपालिका/नगरपंचायत क्षेत्रात दिनांक 4 एप्रिल 2021 रोजी पर्यंत पुढील प्रमाणे प्रतिबंधात्मक लागू करण्याचे आदेश जारी केले आहेत.
लातूर जिल्हयातील सर्व जिम,व्यायाम शाळा, स्पोर्ट कॉम्पलेक्स, योगा, नृत्यवर्ग, खेळाची मैदाने, सर्व क्रीडा प्रकारचे टुर्नांमेंट, वैयक्तिक क्रीडा प्रकार/सराव,स्विमिंग पूल पार्क, अम्युजमेंट पार्क, पर्यंटन स्थळे इतर करमणुकीचे ठिकाणे पूर्णत: बंद राहतील. सर्व चित्रपटगृहे, व्हिडिओगृहे, नाट्यगृहे, व्हिडिओ गेमपार्लर, प्लेंइंग कार्ड रूम, मंगल कार्यालये सभागृह बंद राहतील. जिल्हयातील सर्व हॉटेल्स,बार,परमिटरूम,रेस्टारंट या ठिाकाणी बसून खाण्या पिण्यास मनाई असेल या ठिकाणावरून केवळ पार्सल सुविधा उपलब्ध राहतील. जिल्हयातील सर्व पान शॉप्स,पान टपऱ्या,चहा टपऱ्या इत्यादी बंद राहतील. दि.29 मार्च 2021 रोजीचा साजरा होणारा होळी, धुलिवंदन आणि दि.2 एप्रिल 2021 रोजीची रंगपंचमी हे प्रतिकात्मक पध्दतीने आपल्या कुटुंबात स्वगृही साजरा करण्यात यावे.ऑटोरिक्षामध्ये प्रवासी संख्येची मर्यांदा वाहना चालक एक अधिक दोन तसेच अधिकृत खाजगी टॅक्सी (काळी-पिवळी जीप )मध्ये प्रवासी संख्येची मर्यांदा वाहनचालक एक अधिक पाच प्रवासी इतकी असेल.खाजगी बसेस,एस.टी.,सिटी बसेस मध्ये नो मास्क नो एन्ट्री नियमाच्या पालनासह सिटिंग क्षमतेएवढे व्यक्ती प्रवास करू शकतील कोणत्याही परिस्थितीत सिटिंग क्षमतपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करणार नाहीत याची विशेष खबरदारी घ्यावी.या मागील आदेशातील सर्व निर्बध जशास तसे दि.4 एप्रिल 2021 रोजीपर्यंत लागू राहतील.या आदेशाचे उल्लघन झाल्याचे निर्दशनास आल्यास सबंधिताविरूध्द दंडात्मक व साथरोग प्रतिबंधक कायदा-1897 अन्वये दिलेल्या तरतुदीनुसार भारतीय दंडसंहिता-1860 चे कलम 188 नुसार,आपत्ती व्यवस्थापन अधिनियमन -2005,फौजदारी संहिता-1973 तसेच महाराष्ट्र कोव्हिड-19 उपायोजना नियम-2020 च्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल,याची नोंद घ्यावी असे ही आदेशात नमुद केले आहे.

Most Popular

To Top