लातूर जिल्हा

लातूर जिल्ह्यात आतापर्यंत 75 हजर 170 जणांनी कोरोना प्रतिबंध पहिला डोस घेतला आहे.

महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – लातूर जिल्ह्यात दि. 16 जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येत आहे. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी, सहव्याधी असलेले नागरिक आणि ज्येष्ठ नागरीकंना लस देण्यात येत आहे. आतापर्यंत 75 हजर 170 जणांनी पहिला डोस घेतला आहे. 1 एप्रिलपासून 45 वर्षांपूढील सर्वच नागरिकांना लस देण्यात येणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने जय्यत तयारी केली असून सध्या जिल्हा मुख्यालयाकडे 12 हजार कोरोना लसीचे डोस उपलब्ध आहेत. शिवाय केंद्रस्तरावर ही लस उपलब्ध आहे. सध्या 77 लसीकरण केंद्रावर ही लस उपलब्ध आहे. 1 एप्रिलपासून त्यात वाढ केली जाणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि खाजगी रुग्णालय असे 77 केंद्र आहेत. आता ग्रामीण भागात उपकेंद्रावरही लस देण्याचे नियोजन केले जाणार आहे.गेल्या तीन महिन्यांत लातूर जिल्ह्यातील 75 हजार 170 व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस
घेतला. त्यात 16 हजार 163 आरोग्य सेवक, 14 हजार 60 फ्रंटलाईन कर्मचारी व 38 हजार 447 ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. आरोग्य सेवकांत 8 हजार 314 जणांनी दुसराही डोस घेतला आहे. फ्रंटलाईनच्या 2 हजार 432 जणांनी कोरोनाचा दुसरा डोस घेतला आहे.

जिल्ह्यातील 77 केंद्रांवर दररोज प्रति केंद्रावर 100 जणांना लस देण्याचे नियोजन केले आहे. त्यानूसार लसीकरण सुरु आहे. सर्व केंद्रांना य नियमानूसार लस पुरवठा करण्यात आला असून प्रत्येक केंद्रावर स्टॉक उपलब्ध करण्यात आला आहे. जिल्हास्तरावर 12 हजार डोसेस उपलब्ध आहेत. 1 एप्रिलपासून 45 वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार आहे. त्यामुळे मागणीत वाढ करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार पात्र लाभार्थ्यांसाठी लातूर शहरात एकूण 14 लसीकरण केंद्र उपलब्ध आहेत. यामध्ये विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मनपा रुग्णालय, पटेल चौक याठिकाणी लसीकरण केले जात आहे.

लातूर शहराच्या पूर्व भागातील नागरिकांसाठी मनपाच्या वतीने विवेकानंद चौकातील राजीवनगर नागरी आरोग्य केंद्रातही आता लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सर्व केंद्रावर मोफत लसीकरणाची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय शहरातील 10 खाजगी रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरु आहे. खाजगी रुग्णालयांमध्ये सशुल्क लसीकरण केले जात आहे. शहरातील गायत्री हॉस्पिटल, विवेकानंद रुग्णालय, देशपांडे हॉस्पिटल, अल्फा हॉस्पिटल, येलाले हॉस्पिटल, कृष्णा हॉस्पिटल, लातूर कॅन्सर हॉस्पिटल, सदासुख हॉस्पिटल ही 10 खाजगी रुग्णालये असे एकूण 14 ठिकाणी लसीकरणाची सुविधा उपलब्ध आहे.

1 एप्रिलपासून 45 वर्षांपुढीलसर्वांना लसीकरण

आता 45 वर्षांपुढीलसर्व व्यक्तींना 1 एप्रिलपासून लस देण्याचा कार्यक्रम राबविला जाणार आहे. त्याची जय्यत तयारी करण्यात आली असून लसीकरण केंद्रही वाढविण्यात आलेले आहेत. जिल्ह्याची लोकसंख्या 28 लाखांच्या घरात आहे. यातील 20 टक्के नागरिक 45 वर्षांपूढील वयोगटात येतात. त्यानूसार साडेपाच लाख लोकसंख्या या वयोगटात ग्राह्य धरुन आरोग्य विभागाने त्यांना लस देण्याचे नियोजन केले आहे. सध्या 77 केंद्रांवर लसीकरण सुरु आहे. त्यात वाढ केली जाणार आहे. जिल्हा आरोग्य विभागाकडून केंद्र वाढीसाठी नियोजन करण्यात आले आहे.

Most Popular

To Top