Home » शिक्षण » निट पेपर लिक प्रकरणात केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा झाला आता मोटेगावकरचे RCC क्लासेस कधी बंद होणार ?

निट पेपर लिक प्रकरणात केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा झाला आता मोटेगावकरचे RCC क्लासेस कधी बंद होणार ?

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – निट पेपर लीक प्रकरणात दिल्लीत अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखालील CJP च्या आंदोलनाची दखल घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला. पण त्याच प्रकरणात अटकेत असलेल्या शिवराज मोटेगावकर याचे लातूरसह राज्यातील विविध ठिकाणी चालू असलेले RCC क्लासेस अजूनही का चालू आहेत? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा प्रश्न विचारायला राज्यात दिल्लीसारखे आंदोलन करावे लागेल का?खाकी फाऊंडेशन  CJP चे संस्थापक अभिजित दिपके, सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानिया आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे

आता थेट मागणी केली आहे – निट पेपर लीक प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपी शिवराज मोटेगावकर याचे सर्व RCC क्लासेस तात्काळ बंद करा. बंद न झाल्यास दिल्लीत जसे आंदोलन झाले, तसेच महाराष्ट्रातही आंदोलन उभारले जाईल.

मोटेगावकर हे लातूरमधील RCC चे संस्थापक आहेत. CBI च्या तपासानुसार त्यांनी NTA च्या पेपर सेटरकडून रसायनाचे प्रश्न खरेदी केले, हाताने लिहून ठेवले आणि त्यांचे मुलगा तसेच विद्यार्थ्यांना देण्यात आले. मोबाइलमधून १११ प्रश्न NTA च्या मास्टर सेटशी जुळले. असे असतानाही त्याचे क्लासेस लातूर, पुणे आणि इतर ठिकाणी अजूनही सुरू आहेत, हे विद्यार्थी आणि पालकांचा अपमान आहे. केंद्रात आंदोलन झाले, तर मंत्री गेला. राज्यात मात्र आरोपीचे क्लासेस चालूच आहेत. फडणवीस सरकार ही दोन मापे का ? विद्यार्थ्यांचे भविष्य उध्वस्त करणाऱ्या पेपर लीकच्या आरोपींना राज्यात संरक्षण मिळत आहे का? की फक्त दिल्लीतील आवाज ऐकतो आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या आवाजाकडे आणि वेदनांकडे दुर्लक्ष केला जातो ?

अभिजित दिपके यांच्याकडे खाकी फाऊंडेशनची स्पष्ट मागणी – मोटेगावकरचे सर्व RCC क्लासेस बंद करा, अन्यथा राज्यात दिल्लीसारखे आक्रमक आंदोलन उभे करावे . विद्यार्थी आणि पालक आता शांत बसणार नाहीत. निट पेपर लीकचे आरोपी क्लासेस चालवून पैसे कमावत असतील, तर ते बंद करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. अन्यथा आंदोलन हाच एकमेव पर्याय राहील. राजीनामा घेता येतो, तर क्लासेस बंद करणे का अवघड? फडणवीस सरकारने लगेच कारवाई करावी, अन्यथा महाराष्ट्रातील विद्यार्थीही रस्त्यावर उतरतील.

Share This News

Related Post

National