महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – लातूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. ७ मध्ये सचिन मस्के यांना नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात लोकसमर्थन मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. मागील नगरसेवक कार्यकाळात सुरू केलेली विकासकामे त्यांनी कोणत्याही परिस्थितीत थांबू दिली नाहीत. निवडणुकांमुळे प्रक्रिया थांबली असली तरी सचिन मस्के यांचे जनसेवेचे काम मात्र अखंड सुरू राहिले, हेच त्यांच्या कार्याची खरी ओळख ठरली आहे.
“१२ महिने लोकांच्या सुख-दुःखात धावून जाणारा, जमिनीवरचा लोकप्रतिनिधी” अशी प्रतिमा सचिन मस्के यांनी प्रभागात निर्माण केली आहे. नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांसाठी सतत उपलब्ध असणारा, प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
प्रभागातील पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य सेवा आणि शिक्षण या महत्त्वाच्या क्षेत्रांत त्यांनी सातत्याने काम केले आहे. विशेषतः करोना महामारीच्या कठीण काळात सचिन मस्के यांनी केलेले उल्लेखनीय कार्य आजही नागरिकांच्या स्मरणात आहे. रुग्णांना मदत, गरजू कुटुंबांना आधार आणि प्रशासनाशी समन्वय साधून सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये त्यांनी मोलाची भूमिका बजावली.
लोकसेवेचा वसा घेतलेला, वर्षभर जनतेसोबत उभा राहणारा लोकप्रतिनिधी पुन्हा एकदा महापालिकेत हवा, अशी ठाम भावना प्रभाग क्र. ७ मधील मतदारांमध्ये आहे. त्यामुळेच सचिन मस्के यांना पुन्हा लातूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून पाठवण्याचा निश्चय नागरिकांनी केल्याचे चित्र सध्या प्रभागात स्पष्टपणे दिसून येत आहे.





