युवा, संघर्षशील आणि सामाजिक जाणिवांचा चेहरा असलेले दत्तात्रय टेकाळे पाटील यांची काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी

महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – मराठा आणि सामाजिक चळवळीच्या संघर्षातून उभे राहिलेले, जनतेच्या दुःखाशी आपुलकीने नाते जोडणारे युवा नेतृत्व दत्तात्रय टेकाळे पाटील यांनी काँग्रेसकडे एकुरगा जिल्हा परिषद गटातून काँग्रेस पक्षाकडे त्यांनी अधिकृतपणे उमेदवारीची मागणी केल्याने परिसरात आशा, अपेक्षा आणि विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महिला, कष्टकरी, रुग्ण आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर ते केवळ बोलत नाहीत, तर प्रत्यक्ष मदतीसाठी धावून जातात. अडचणीच्या काळात आधार देणारा, निराशेच्या क्षणी आशेचा हात देणारा नेता म्हणून टेकाळे पाटील यांची ओळख आहे. त्यांच्या सामाजिक जाणिवेतून अनेक गरजूंच्या जीवनात दिलासा मिळाला आहे.

परिसरातील शिक्षण, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा आणि रस्ते विकास यांसारख्या मूलभूत प्रश्नांसाठी त्यांनी वेळोवेळी प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींशी थेट संपर्क साधून कामे मार्गी लावली. कोणतीही अधिकृत पदे नसताना केवळ जनसेवेच्या भावनेतून त्यांनी लोकांच्या प्रश्नांसाठी लढा दिला, हेच त्यांच्या कार्याचे खरे वैशिष्ट्य आहे.

आज एकुरगा जिल्हा परिषद गटातील जनतेला असे नेतृत्व हवे आहे, जे केवळ निवडणुकीपुरते नाही तर रोजच्या जीवनात सोबत उभे राहील. दत्तात्रय टेकाळे पाटील यांच्या उमेदवारीकडे म्हणूनच केवळ राजकीय निर्णय म्हणून नव्हे, तर जनभावनेचा आवाज म्हणून पाहिले जात आहे. काँग्रेसने या युवा, संघर्षशील आणि जनतेच्या हृदयाशी नाते जोडणाऱ्या नेतृत्वावर विश्वास दाखवावा, अशी भावनिक आणि ठाम अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे.