सौर कृषी पंप योजनेतील सोलार कंपन्या कडून शेतकऱ्यांना होणारा त्रास थांबवा नाहीतर राज्य भर आंदोलन करू- शेतकरी नेते नेहरू देशमुख BKU मराठवाडा अध्यक्ष

महाराष्ट्र खाकी ( विवेक जगताप / लातूर ) – शेतकरी नेते नेहरू देशमुख भारतीय किसान युनियन मराठवाडा अध्यक्ष यांनी महाराष्ट्र शासनाच्या मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत ओसवाल सोलार कंपनीकडून शेतकऱ्यांना होणाऱ्या समस्या सोडवून इथून पुढे शेतकऱ्यांना त्रास दिला तर तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या प्रक्रियेत लातूर जिल्ह्यात सोलार कंपनी कडून शेतकऱ्यांना

होणारा त्रास आणि पैसे किंवा वेगळ्या प्रकारच्या मदतीबद्दल लातूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी शेतकरी नेते नेहरू देशमुख भारतीय किसान युनियन मराठवाडा अध्यक्ष यांच्या कडे येत असल्यामुळे आज शेतकरी नेते नेहरू देशमुख यांनी मागेलत्याला सौर कृषी पंप योजनेच्या अंतर्गत येत असलेल्या ओसवाल कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरून नियमानुसार काम झाले पाहिजे असा दम दिला आणि

असं नाही झाले तर भारतीय किसान युनियनच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला आहे. आणि महा वितरणच्या आधीकाऱ्यांना भेटून संबंधीत ओसवाल कंपनी बद्दल तक्रार दिली आणि शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक बद्दल चर्चा केली, तरी संबंधित अधिकारी यांनी त्वरित कारवाई केली आणि असा प्रकार होणार नाही असा शब्द दिला.

शेतकऱ्यांच्या काय तक्रारी आहेत.
1) सोलार कंपन्या शेतात ठिकाणावर येण्यास टाळाटाळ करतात
2) गावात आल्यावर शेतकऱ्यांना स्वतःचे वाहन करून सोलारचे सर्व साहित्य घेऊन जाण्यास सांगतात
3) शेतकऱ्यांना वेगवेगळ्या कामासाठी पैशाची मागणी करतात
4) सोलार योजनेत वाळू सिमेंट असूनही शेतकऱ्यांना वाळू सिंमेंटची मागणी करतात
5) शेतकऱ्यांना कामासाठी मजुरांची मागणी करतात

शेतकरी नेते नेहरू देशमुख काय म्हणाले
शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यानंतर त्वरित शेतकरी नेते नेहरू देशमुख ठिकाणावर जाऊन ओसवाल कंपनीच्या लातूर जिल्हा ऑफिस च्या अधिकाऱ्याशी संपर्क करून संबंधित प्रकारबद्दल विचारणा केली आणि इथून पुढे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मागणी किंवा त्रास दिला तर तीव्र आंदोलन करू असे म्हणाले, पण संबंधित ओसवाल कंपनीचे अधिकारी गोरटे यांनी उद्धट पणे बोलून शेतकऱ्यांना बिनधास्त तक्रार करा असे म्हणुन बोलणे टाळले आणि नंतर फोन घेतला नाही असे शेतकरी नेते नेहरू देशमुख भारतीय किसान युनियन मराठवाडा अध्यक्ष म्हणाले.