महाराष्ट्र खाकी ( विवेक जगताप) – ग्रामीण भागातील फील्ड व्हिजिटवर विशेष भर देण्यात यावा कम्युनिटी हेल्थ ऑफिसर (CHO) , आशा स्वयंसेविका आणि आरोग्य कर्मचारी यांनी सातत्याने गृहभेटी द्याव्यात आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांच्या कडक सूचना, आरोग्य विभागाच्या मराठवाडा परिमंडळस्तरीय आढावा बैठक पार पडली. या बैठकीत शासकीय रुग्णालयांमध्ये दिल्या जाणाऱ्या
सेवांबाबत, कामाच्या दर्जाबाबत तसेच स्वच्छता, लॉन्ड्री व्यवस्था आणि रुग्ण आहार (Diet) या सेवांकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या. आणि विशेष म्हणजे ग्रामीण भागातील फील्ड व्हिजिटवर विशेष भर देण्यात यावा, सर्व अधिकाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांना नियमित भेट द्यावी आणि कम्युनिटी हेल्थ ऑफिसर (CHO) , आशा
स्वयंसेविका आणि आरोग्य कर्मचारी यांनी सातत्याने गृहभेटी द्याव्यात. आरोग्य सेवा अधिक सक्षम, आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी शासन 24×7 कार्यरत आहे. प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून प्रभावीपणे काम करने गरजेचे असल्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले. या बैठकीस आरोग्य विभागाच्या सहसंचालक डॉ. सुनिता गोल्हाईत, उपसंचालक डॉ. कांचन वानेरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.शिवाजी सुक्रे , डीन मेडिकल कॉलेज, मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांतील वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





