Home » पोलीस » ACB NEWS शेतकऱ्याला लुटणाऱ्या भ्रष्ट वनपाल जमीर सिराज शेखवर बारामतीत अँटी करप्शनने १० हजारांची लाच घेताना घेतले ताब्यात

ACB NEWS शेतकऱ्याला लुटणाऱ्या भ्रष्ट वनपाल जमीर सिराज शेखवर बारामतीत अँटी करप्शनने १० हजारांची लाच घेताना घेतले ताब्यात

महाराष्ट्र खाकी (पुणे / विवेक जगताप ) – बारामतीत लाचखोर वनपालाची मस्ती जिरली, शेतात माती टाकण्यासाठी मागितलेली १० हजारांची लाच ‘एसीबी’ने केली वसूल; जमीर सिराज शेख जाळ्यात, शेतकऱ्याच्या तळपायाची आग मस्तकात जाणाऱ्या एका गंभीर प्रकरणात, हक्काच्याच शेतात माती टाकण्यासाठी चक्क १० हजार रुपयांची लाच उकळणाऱ्या एका बड्या वनपालाला (Forest Guard) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) अगदी बेड्या ठोकून जेरबंद केले आहे. जमीर सिराज शेख (वय ४७, रा. बारामती, जि. पुणे) असे या लाचखोर भ्रष्ट वनपालाचे नाव असून, या कारवाईमुळे वनविभागात मोठी खळबळ उडाली आहे. ​तक्रारदाराची कोन्हाळे खुर्द येथे ४ हेक्टर शेतजमीन असून मुसळधार पावसामुळे या शेतातील माती वाहून गेली होती. त्यामुळे शेतकरी आपल्याच शेतात नदीपात्रातील माती टाकत होता. मात्र, याच गोष्टीचा गैरफायदा घेत करंजे राउंड ऑफिसर, वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय बारामती येथे कार्यरत असलेला वनपाल जमीर शेख याने २५ सप्टेंबर २०२६ रोजी तिथे धडक देत हे काम वनविभागाच्या मालकीचे असल्याचे सांगून कारवाईची भीती दाखवली.

​कारवाई टाळण्यासाठी आणि काम सुरळीत चालू ठेवण्यासाठी या निर्लज्ज वनपालाने तक्रارदाराकडे थेट १० हजार रुपयांची लाच मागितली. यातील ४ हजार रुपये त्याने त्याच दिवशी बळकावले, तर उर्वरित ६ हजार रुपयांसाठी वारंवार तगादा लावून लाच उकळण्याचा सपाटा सुरू ठेवला. ​शेतकऱ्याने या भ्रष्टाचाराविरोधात थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी (ACB) संपर्क साधला. एसीबीच्या पथकाने २३ ऑक्टोबर रोजी पडताळणी केली असता, वनपाल जमीर शेख याने १० हजार रुपयांची लाच मागितल्याचे आणि त्यातील ४ हजार रुपये आधीच स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. ​याच पडताळणीच्या आधारे, आज दि. २५/१०/२०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बारामतीमधील माळेगाव येथील हॉटेल शिवकृपा (आय.टी.आय. समोर) परिसरात सापळा रचला. या सापळ्यात लाचखोर वनपाल जमीर शेख याने तक्रارदाराकडून उरलेली ६ हजार रुपयांची लाचेची रक्कम पंचासमक्ष स्वीकारली आणि एसीबीच्या पथकाने त्याला जागीच रंगेहात बेड्या ठोकल्या.

​या प्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ (सुधारित २०१८) च्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे लक्षांत ठेवून आहे की, अशा प्रकारे शेतकऱ्यांना लुटणाऱ्या एकाही भ्रष्ट अधिकाऱ्याची गय केली जाणार नाही. ​ही धडक कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे लक्षांत ठेवून पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक अजित पाटील, पोलीस उपअधीक्षक सतीश बाळकुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस हवालदार प्रवीण तावरे, वैशाली माकर व श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अविनाश चव्हाण यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Share This News

Related Post

National

DIG NANDED NEWS ​लातूर स्थानिक पोलिसांच्या हलगर्जीपणावर DIG शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाचा सर्जिकल स्ट्राईक, लातुरात वाळू, मटका व जुगार अड्ड्यांवर धाड; १८ जण जाळ्यात, ६२ लाखांचा मुद्देमाल जप्त