Home » प्रशासकीय » महसूलमंत्र्यांनी रॉयल्टी माफ केली पण मांडळ अधिकारी बालाजी केंद्रे ची प्रायव्हेट रॉयल्टी वसुली जोरात, स्थानिक आमदार निलंगेकर थांबवतील का केंद्रेची ही मुघलशाही वसुली ?

महसूलमंत्र्यांनी रॉयल्टी माफ केली पण मांडळ अधिकारी बालाजी केंद्रे ची प्रायव्हेट रॉयल्टी वसुली जोरात, स्थानिक आमदार निलंगेकर थांबवतील का केंद्रेची ही मुघलशाही वसुली ?

महाराष्ट्र खाकी ( ​देवणी / विवेक जगताप ) – राज्यात एकीकडे भीषण कोरड्या दुष्काळाची परिस्थिती असताना, बळीराजाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकार आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रस्ते व शेतीच्या कामांसाठी तलावांतील गाळ, माती, मुरूम आणि गिट्टीवरील रॉयल्टी (स्वामित्वधन) पूर्णपणे माफ करण्याची घोषणा केली आहे. स्थानिक आमदार संभाजी पाटील निलंगेकर व महसूल मंत्री शेतकरी हिताचे निर्णय घेऊन दिलासा देण्याचा प्रयत्न करत असताना, देवणी तालुक्यातील महसूल यंत्रणेतील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी मात्र स्वतःचे ‘खाजगी दुकान’ सुरू केले आहे. ​देवणी तालुक्यातील मंडळ अधिकारी (सरकल) बालाजी केंद्रे याच्या मुघलशाही व जुलमी कारभाराने शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत. शासनाने शासकीय रॉयल्टी माफ केली असली, तरी केंद्रे महाशयांनी शेतकऱ्यांकडून “स्वतःची खाजगी रॉयल्टी” वसुली सुरू केल्याचा गंभीर आरोप होत आहे.

​पैसे दिले तरच गाडी सुटणार; अन्यथा जप्तीची कुऱ्हाड
दुष्काळामुळे तलाव कोरडे पडल्याने शेतकरी आपल्या शेतात किंवा कामासाठी तलावातील माती-गाळ ट्रॅक्टर व टिप्परद्वारे घेऊन जात आहेत. मात्र, ही वाहने अडवून मंडळ अधिकारी बालाजी केंद्रे यांच्याकडून अव्वाच्या सव्वा पैशांची मागणी केली जात आहे. जे शेतकरी पैसे देण्यास नकार देतात, त्यांची वाहने थेट जप्त केली जात असून, हप्ते वसुली केल्याशिवाय वाहने सोडली जात नाहीत. ​विशेष म्हणजे, “या गोळा केलेल्या पैशांतून देवणीचे तहसीलदार सोमनाथ वाडकर आणि उपविभागीय अधिकारी (SDM) सागर मुळीक यांनाही त्यांचा वाटा असतो!,” असा बेधडक दावा स्वतः मंडळ अधिकारी बालाजी केंद्रे दिप्पर, ट्रॅक्टर चालक आणि शेतकऱ्यांना करत असल्याचे समजते! त्यामुळे ही केवळ एका अधिकाऱ्याची मनमानी आहे की, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अभयाने सुरू असलेला संघटित भ्रष्टाचार? असा संतापजनक सवाल आता उपस्थित होत आहे.

​एकडे लोकप्रतिनिधी आणि शासन दुष्काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याच्या गप्पा मारत आहेत, तर दुसरीकडे प्रत्यक्ष जमिनीवर काम करणारे हे अधिकारी ‘रक्षकच भक्षक’ बनून बळीराजाची उघडउघड लूट करत आहेत. ​आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या मतदारसंघातच असा प्रकार घडत असल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शासकीय निर्णयाला पायदळी तुडवणाऱ्या या बालाजी केंद्रेच्या मुघलशाही कारभाराला वरिष्ठ प्रशासन आणि लोकप्रतिनिधी वेसण घालणार की शेतकऱ्यांची अशीच पिळवणूक उघड्या डोळ्यांनी पाहणार? असा रोखठोक सवाल देवणी तालुक्यातील शेतकरी विचारत आहेत. या भ्रष्ट अधिकाऱ्यावर तत्काळ कठोर कारवाई करून त्याला निलंबित करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Share This News

Related Post

National

DIG NANDED NEWS ​लातूर स्थानिक पोलिसांच्या हलगर्जीपणावर DIG शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाचा सर्जिकल स्ट्राईक, लातुरात वाळू, मटका व जुगार अड्ड्यांवर धाड; १८ जण जाळ्यात, ६२ लाखांचा मुद्देमाल जप्त