लातूर पॅटर्न–बावनकशी सोनंच’, गुण नव्हे स्वप्नं महत्त्वाची, बप्पा गणेश मंडळाच्या पथनाट्यातून खरा ‘लातूर पॅटर्न’ समोर
महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रतिनिधी ) – शिक्षणाची नगरी म्हणून देशभरात ओळख निर्माण केलेल्या लातूरच्या ‘लातूर पॅटर्न’ची नवी आणि व्यापक व्याख्या यंदा बप्पा गणेश मंडळ आपल्या पथनाट्यातून प्रभावीपणे मांडत आहे. ‘लातूर पॅटर्न–बावनकशी सोनंच’ या संकल्पनेतून सादर होणारे हे पथनाट्य केवळ परीक्षेतील गुण, निकाल किंवा करिअरच्या पारंपरिक चौकटीपुरते मर्यादित न राहता, विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, पालकांच्या…









