महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – प्रभाग क्र. १० मध्ये सौ. हेमा येळे यांचे पारडे जड असल्याचे लक्षात घेऊन काही विरोधकांनी जाणीवपूर्वक त्यांच्या उमेदवारीवर हरकत घेतली होती. मात्र, निवडणूक याचिकेत हस्तक्षेप करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिल्यामुळे सत्याचा आणि लोकसेवेचा विजय झाला आहे. न्यायालयाच्या या ठाम निर्णयामुळे सौ. हेमा येळे यांच्या विजयाचा मार्ग पूर्णतः मोकळा झाला आहे.
लोकप्रतिनिधी नसतानाही प्रभाग १० च्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणाऱ्या, जनतेच्या अडीअडचणींमध्ये नेहमी धावून जाणाऱ्या सौ. हेमा येळे यांनी यावेळी लातूर महानगरपालिका निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निःस्वार्थ सेवाभावाची दखल घेत भारतीय जनता पक्षाने त्यांना अधिकृत उमेदवारी देत त्यांच्या कार्याचा आणि पक्षनिष्ठेचा सन्मान केला.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतरही विरोधकांनी पुन्हा हरकती घेत अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिल्याने विरोधकांचे मनसुबे उधळून लागले. या निर्णयामुळे प्रभाग १० मधील सौ. हेमा येळे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सौ. हेमा येळे या केवळ उमेदवार नसून त्या प्रभाग १० च्या विकासाची आशा आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, महिलांचे प्रश्न, युवकांना संधी, सामाजिक उपक्रम अशा विविध विषयांवर त्यांनी आतापर्यंत प्रत्यक्ष काम करून लोकांचा विश्वास संपादन केला आहे. न्यायालयाच्या निर्णयाने त्यांच्या प्रामाणिक कार्यावर शिक्कामोर्तब झाल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.




