“काम, विश्वास आणि नेतृत्वाचा चेहरा – प्रभाग १५ मध्ये प्रेरणा होनराव यांना वाढते जनसमर्थन”

महाराष्ट्र खाकी (विवेक जगताप / लातूर ) – लातूर महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. १५ मधील जनमानस स्पष्ट संकेत देत आहे. प्रभागातील नागरिकांचा कल, चर्चा आणि वातावरण पाहता एकच सूर उमटत आहे— यावेळी बदल हवा, आणि तो बदल घडवू शकतात प्रेरणा होनराव.

दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित राहिले. कचरा व्यवस्थापन असो, गटारांची साफसफाई, आरोग्य सुविधा किंवा सार्वजनिक मैदानांचा अभाव—या सगळ्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी होती. मात्र आता ही नाराजी आशेत बदलताना दिसत आहे. कारण जनतेला विश्वास वाटतो की, कामाला प्राधान्य देणारा आणि जबाबदारीची जाणीव असलेला नेतृत्वाचा चेहरा म्हणजे प्रेरणा होनराव.

शैक्षणिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या लातूरमधील कोचिंग क्लासेसचा गजबजलेला परिसर, हजारो विद्यार्थी, पालक आणि व्यावसायिक यांचे प्रश्न समजून घेणारी भूमिका प्रेरणा होनराव सातत्याने मांडत आल्या आहेत. त्यामुळेच या प्रभागातील मध्यमवर्ग, व्यापारी वर्ग आणि युवकांमध्ये त्यांच्या नावाबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संघटनात्मक ताकद, भाजपाचा वाढता जनाधार आणि त्याला लाभलेले शिस्तबद्ध कार्यकर्ते यामुळे प्रभागात वेगळीच ऊर्जा जाणवते. त्यातच प्रेरणा होनराव यांची अभ्यासू मांडणी, ठाम भूमिका आणि कामातून विश्वास निर्माण करण्याची पद्धत नागरिकांच्या मनात घर करत आहे.

“कोण बोलतं यापेक्षा कोण काम करतं हे महत्त्वाचं” अशी भावना आता प्रभाग क्र. १५ मधील चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. त्यामुळेच लोकभावना हळूहळू पण ठामपणे प्रेरणा होनराव यांच्या बाजूने झुकताना दिसत आहे.

प्रभाग क्र. १५ मध्ये यावेळी केवळ निवडणूक नाही, तर विश्वासाचा कौल दिला जाणार आहे—आणि तो कौल प्रेरणा होनराव यांच्या बाजूने स्पस्ट दिसत आहे , अशीच एकंदर लोकभावना सध्या स्पष्टपणे उमटत आहे.