महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप) – लातूर भाजपाचे ग्रामीण आणी शहर जिल्हाध्यक्ष पदासाठी बसवराज पाटील आणी अजित पाटील कव्हेकर यांच्या नावाची घोषणा झाली पण हे दोन्ही जिल्हाध्यक्ष फक्त नामधारी असल्याचे बोलले जात आहे, औसा मतदारसंघाचे माजी आमदार, माजी मंत्री आणी मूळचे धाराशिव जिल्ह्यातील बसवराज पाटील यांची भारतीय
जनता पक्षाच्या लातूर ग्रामीण आणी माजी नगरसेवक अजित पाटील कव्हेकर यांची लातूर शहर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली पण हे दोघे ही जिल्हाध्यक्ष फक्त नामधारी असल्याचे बोलले जात आहे, कारण लातूर जिल्ह्यातील राजकारण आणी भाजपा मधील गटबाजी या नामधारी अध्यक्ष्याच्या निवडीला कारणीभूत आहे, लातूर शहर साठी
माजी नगरसेवक अजित पाटील कव्हेकर यांनी निवड केली आहे पण अजित पाटील कव्हेकर हे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या जवळचे आणी विश्वासू मानले जातात, अजित पाटील कव्हेकर यांचे वडील मा. आमदार शिवाजीराव कव्हेकर पाटील यांना राजकारणाचा चांगलाच अनुभव आहे आणी सर्वात महत्वाचे म्हणजे लातूर शहर मनपा वर आधीपासून
निलंगेकराचे वर्चस्व राहिले आहे मनपाच्या निवडणुकीत निलंगेकरांचा चांगला हस्तक्षेप असतो त्यामुळे अजित पाटील कव्हेकर हे फक्त नामधारी अध्यक्ष असतील आणी कारभार म्हणजे मा. आ. शिवाजीराव कव्हेकर पाटील आणी निलंगेकर पाहतील आणी लातूर शहर आणी मनपा वर आपले वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न करतील याचा प्रत्यक्ष अनुभव आगामी
मनपाच्या निवडणुकीत दिसून येईल! आणी तिकडे लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील हे अर्चना पाटील चाकूरकर आणी आमदार अभिमन्यू पवार यांच्या जवळचे मानले जातात म्हणून ते पण नामधारी असतील आणी त्यांचा कारभार अर्चना पाटील चाकूरकर आणी आमदार अभिमन्यू पवार पाहतील आणी हे सर्व आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत दिसून येईल…!
