हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे लोकार्पण, अभियंता डॉ. अनिलकुमार गायकवाड यांचे विशेष योगदान

महाराष्ट्र खाकी (लातूर / प्रतिनिधी ) – हिंदू  हृदय सम्राट बाळासाहेब  ठाकरे यांच्या  नावे  साकारलेला ‘समृद्धी महामार्ग’  म्हणजे  महाराष्ट्राच्या  विकासाच्या दिशेने घेतलेले एक  क्रांतिकारी  पाऊल. नागपूरपासून  मुंबईपर्यंत धावणारा हा  महामार्ग म्हणजे  आधुनिक भारताच्या  अभियंता दृष्टिकोनाचा  आणि  नियोजनशैलीचा अत्युत्तम  नमुना आहे. या ऐतिहासिक

प्रकल्पाचे  लोकार्पण  मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते  मोठ्या दिमाखात  पार पडले. या प्रकल्पात  महाराष्ट्र राज्य  रस्ते विकास  महामंडळ (MSRDC) ची भूमिका  अत्यंत महत्त्वाची  आहे. या महामंडळाचे व्यवस्थापकीय  संचालक (MD)  म्हणून माझे  मोठे बंधू डॉ. अनिलकुमार  बळीराम गायकवाड  यांनी या प्रकल्पाच्या  यशस्वी अंमलबजावणीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी दाखवलेले

प्रशासनिक  कौशल्य, अभियंता  दृष्टीकोन, वेळेचे भान आणि  कार्यप्रणालीमधील  पारदर्शकता यामुळेच हा महामार्ग  दर्जेदार, भव्यदिव्य  आणि वेळेआधी  पूर्ण होऊ  शकला. समृद्धी  महामार्गाच्या  उद्घाटनप्रसंगी  माननीय उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे  आणि  माननीय  उपमुख्यमंत्री  अजित  पवार यांनी या  महामार्गाचे व  अभियंत्यांचे  भरभरून कौतुक केले. विशेषतः

या प्रकल्पामागील तांत्रिक अचूकता, सुलभता  आणि  पर्यावरणपूरक  दृष्टिकोन  याबद्दल त्यांनी प्रशंसा  व्यक्त  केली. आज  महाराष्ट्राच्या  जनतेला,  शेतकऱ्यांना, उद्योजकांना, विद्यार्थी  आणि प्रवाशांना  जलद आणि  सुरक्षित प्रवासाचा  मार्ग उपलब्ध  झाला आहे. यामध्ये ज्या  इंजिनियरिंग  नेतृत्वाची भूमिका  ठरली, ते माझे  मोठे बंधू अण्णा डॉ. अनिलकुमार

बळीराम गायकवाड  यांचे मी मन:पूर्वक  अभिनंदन करतो आणि  कृतज्ञतेने त्यांचे  जाहीर आभार मानतो. त्यांच्या योगदानामुळे  महाराष्ट्राचा हा “ड्रीम प्रोजेक्ट” प्रत्यक्षात  साकारला गेला आणि  देशातील एक आदर्श प्रकल्प  म्हणून उभा राहिला. हा महामार्ग  फक्त भौतिकदृष्ट्या  नव्हे तर महाराष्ट्राच्या  विकासदृष्टीने आणि अभिमानदृष्टीनेही  समृद्धीचा मार्ग ठरेल, यात शंका  नाही. – प्रो. डॉ. अ‍ॅड. सुनील बळीराम  गायकवाड (माजी खासदार, लेखक, सामाजिक कार्यकर्ता,वकील )

Recent Posts