महाराष्ट्र खाकी (लातूर / प्रतिनिधी ) – NTA द्वारे घेण्यात आलेल्या JEE Main 2025 परीक्षेत Reliance Latur Pattern ने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी घवघवीत यश मिळवून महाराष्ट्रातील सर्वोकृष्ट यशाची परंपरा अबाधित ठेवली आहे. JEE Mains या परीक्षेचे पहिले सत्र 22 जानेवारी ते 30 जानेवारी 2025 आणि दुसरे सत्र 02 एप्रिल ते 09 एप्रिल या दरम्यान पार पडले. संपूर्ण भारतातून साधारणतः 15.39 लाख
विद्यार्थ्यांनी हि परीक्षा दिली होती. दि. 19 एप्रिल 2025 पर्यंत हाती आलेल्या निकालाप्रमाणे रिलायन्स लातूर पॅटर्न मधून नामांकित मानल्या जाणाऱ्या अभियांत्रिकी IIT-JEE ॲडव्हान्स परीक्षेसाठी 37 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. त्यापैकी 2 विद्यार्थ्यांनी 99 अधिक गुण संपादन केले. तर, 95 पर्सेन्टाइल च्या पुढे 10 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. यामध्ये चि. ध्रुव पारसेवार या विद्यार्थ्याने (99.909) पर्सेन्टाइल, ऑल इंडिया
रँक 746 मिळवत महाविद्यालयांतून प्रथम क्रमांक पटकावला. तर, चि. अथर्व नराचे (99.86) या विद्यार्थ्यांनी द्वितीय येण्याचा सन्मान मिळवला. चि. प्रेम जाधव (98.54), चि. हनुमान कुंदरगे (97.86), चि. समीर शेख (95.57), कु. सिद्धी तोडकरी (96.90), चि. निलेश पाटील (96.51), चि. अमन पठाण (96.48), कु. शिवानी कांबळे (95.05), चि. श्रेयश दंडनायक, चि. ओंकार हरनुळे इ. विद्याथ्यांनी यश संपादन
केले. Reliance Latur Pattern च्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या एकत्रित व सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे हे यश साध्य झाले आहे. Reliance Latur Pattern च्या प्राध्यापकांनी अधिकाधिक नाविन्यपूर्ण उपक्रमातून याहूनही दैदीप्यमान निकाल संपादन करावा असे संस्थेचे अध्यक्ष प्रा. उमाकांत होनराव सर यांनी मनोगत व्यक्त केले. इयत्ता 10 वी मध्ये अत्यंतसाधारण गुणवत्ता असतानाही; अवघ्या दोन वर्षामध्ये;
शालेय जीवनापासून IIT ची तयारी केलेल्या विद्यार्थ्यांसोबत देशपातळीवर JEE Mains परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल विद्यार्थ्यांचे संस्थध्यक्ष प्रा. उमाकांत होनराव सरांनी अभिनंदन केले. यशाबद्दल संस्थाध्यक्ष प्रा. उमाकांत होनराव सर, संस्थेच्या सचिव तथा महाविद्यालयाच्या प्राचार्या मा. सुलक्षणा केवळराम मॅडम, संस्थेच्या कोषाध्यक्ष मा. प्रेरणा होनराव, संस्थेचे कार्यकारी संचालक ओंकार होनराव, अकॅडेमिक प्रमुख प्रा.
संगम खराबे, प्रा. रामशंकर यादव, प्रा. सुनील कुमार वर्मा, प्रा. विकास कुमार सोनी, प्रा. अमित सेंगार, प्रा. गौतम कुमार, प्रा. रोहित यादव, प्रा. सतिष पाटील, प्रा. प्रसाद कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांचे या दैदीप्यमान यश प्राप्तीसाठी कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
