आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर साहेब अमरावती सारखा दौरा धाराशिव जिल्ह्यातही करा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरिदास यांच्या हाताबाहेर गेलीय परिस्थिती..!

महाराष्ट्र खाकी (धाराशिव / विवेक जगताप) –कडक आणी शिस्तबद्ध राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांनी अमरावतीत सरकारी रुग्णालयाना अचानक भेट दिली आणी काम चुकार डॉक्टर आणी इतर कर्मचाऱ्यांना निलंबित केले, पण अमरावती पेक्षा भयानक परिस्थिती मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्याची आहे, धाराशिव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीशहरिदासयांच्याकार्यालाआणीकारभाराला

जिल्ह्यातील काही आरोग्य अधिकारी, डॉक्टर आणी कर्मचारी संगणमत करून कर्तव्यात कसूर करत आहे आणी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या डोळ्यात धुळफेक करत आहेत, पण ही गोष्टी डॉ. हरिदास यांच्या लक्षात येत नाही. ही बाब राज्याच्या कर्तव्यदक्ष आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांच्या लक्षात येईल का ? का फक्त स्टंट बाजी साठी अमरावतीत अचानक दौरा करून निलंबणाची कारवाई केली आहे ? धाराशिवजिल्ह्यातील

काही आरोग्य अधिकारी आपल्या आरोग्य केंद्रात त्यांच्या सवडीनुसार जातात आणी शासनाची फसवणूक करतात या सर्व प्रकारात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास आणी आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांच्या कारभारावर जनता नाराज होत आहे. ही बाब आरोग्य मंत्री यांनी लक्षात घेऊन एक अमरावतीसारखा अचानक दौराकराव व अशा कामचुकार डॉक्टर, कर्मचारी यांना निलंबित किंवा योग्य ती कारवाई करावी

नाहीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास यांनी यावर कारवाई करावी असे लोक चर्चा करत आहेत. धाराशिव जिल्ह्यातील प्रमुख्याने लोहारा, उमरगा या तालीक्यातील तालुका आरोग्य अधिकारी यांच्या आशीर्वादाने हा सर्व प्रकार चालू आहे. या चालू प्रकारावर लवकरात लवकर कारवाई केली तर आरोग्य विभागाची होणारी बदनामी थांबेल…

Recent Posts