महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप) –आयपीएल क्रिकेटसामन्यांवरलातूरजिल्ह्यातजोरदार सट्टा सुरू आहे. प्रत्येक सामन्यावर लाखो रुपयांचे बेटिंग लावण्यात येत आहे. लातूरजिल्ह्यातीलक्रिकेटबेटिंगचेनियंत्रणलातूरशहरातूनकरण्यातयेतआहे. प्रत्येकवर्षी आयपीएल क्रिकेट सामन्यावर लाखो रुपयांचा सट्टा लावला जातो. कोण जिंकणार, यावर सर्वाधिक सट्टा लावला जातो. लातूरजिल्ह्यातीलबेटिंगबुकींनी
स्वतंत्र वेवस्था निर्माण केले असून त्यासाठी एजंट देखील नेमले आहेत. जिल्ह्यातील बुकींनी नेमलेल्या एजंटाकडे बेटिंग लावण्यासाठी पैसे रोख किंवा ऑनलाईन द्यावे लागतात. ग्राहकाच्या नावाने आलेल्या या पैशा वरून प्रत्येक सामन्यात कोणता संघ जिंकणार, किती धावा काढणार, कोणता फलंदाज किती धावा काढणार, कोणता गोलंदाज किती बळी घेणार, महत्त्वाच्या आणि अटीतटीच्या सामन्यात किती षटकार होणार,
यावर जिल्ह्यात जोमात बेटिंग सुरू आहे. शिवाय हॉटलाईन वरून देखील थेट बुकिंग घेण्याची सोय देखील बुकींनी केली आहे. लातूर शहर , उदगीरसह कर्नाटक सीमाभागातील परिसरातील आयपीएल बेटिंगवरही लातुरातील बेटिंग बुकींचे नियंत्रण आहे. आयपीएल सीझन सुरू झाल्यानंतर सट्टा बाजारात मोठ्या उलाढाली होत असतात. संपूर्ण लातूर जिल्ह्यातील बेटिंग बुकी देखील यामध्ये सक्रिय असतात.
त्यामुळे आयपीएल सीझनमध्ये सट्टा बाजारात लाखो रुपयांची उलाढाल प्रत्येक सामन्यामध्ये होत असते. गेल्यावर्षी लातूर पोलिसांनी एका बुकी अड्ड्यावर छापा टाकत कारवाई केली होती. यावर्षी सुरू झालेल्या सट्टा बाजाराकडे मात्र पोलिसांचे सोयीस्कर दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते.
