महाराष्ट्र खाकी ( दिल्ली / प्रतिनिधी ) – लातूर लोकसभा चे माजी खासदार संसद रत्न प्रो. डॉ. एडवोकेट सुनील गायकवाड यांनी लिहलेले दोन पुस्तके भारतीय संविधान की विशेषताए और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का दृष्टीकोन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी और समरसता हे दोन पुस्तके हिंदी भाषेत प्रकाशित केले आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि भारतीय जनता पार्टी चे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर , समरसता मंच चे महाराष्ट्र गोवा चे प्रमूख
निलेश गद्रे यांच्या हस्ते न्यू महाराष्ट्र सदन येथील भव्य अशा कार्यक्रमात प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की माजी खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड यांनी अतिशय अभ्यासपूर्ण असे हे दोन्ही पुस्तके लिहली आहेत. संविधानाच्या बाबतीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दृष्टिकोन आणि समरसता या बाबतीत लिहलेले हे दोन्ही पुस्तके समाजासाठी उपयुक्त ठरणार आहेत. ते सर्वांनी वाचले पाहिजेत म्हणजे संविधान समजेल असे म्हणाले .
देशाची राज्यघटना कोणीच बदलू शकणार नाही. ती मजबूत घटना आहे आणि डॉ सुनील गायकवाड यांचे हे दोन्हीही पुस्तके समरसतेचे दिशा दर्शक आहेत ते प्रत्येकानी वाचले पाहिजेत. भारतीय जनता पार्टी चे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर जी म्हणाले की डॉ सुनील वत्सला बळीराम गायकवाड यांनी अनेक विषयात पदव्युत्तर पदव्या घेतलेले अनेक विषयाचे अभ्यासक माजी खासदार यांनी अभ्यासपूर्ण असे हे दोन ग्रंथ लिहले असून 1.भारतीय संविधान की विशेषताए और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
का दृष्टीकोन आणि 2. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और समरसता हे दोन पुस्तके हिंदी भाषेत प्रकाशित केले आहेत. त्यांच्या या कामाचे विशेष कौतुक सुनील देवधर यांनी करून हे दोन्ही पुस्तके योग्य वेळी प्रकाशित झाले आहेत. हे दोन्ही विषय समाजासाठी सध्याच्या काळात चर्चिली जात असलेल्या विषयांवर अभ्यासपूर्ण पुस्तके लिहले आहेत. ते सर्वांनी वाचावेत आणि पुस्तकाचे म्हत्व सांगताना भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तक प्रेम आणि वाचनाची तळमळ असलेले
अनेक उदाहरण त्यांनी दिले. डॉ सुनील गायकवाड यांच्या अनेक पदव्या बद्दल कौतुक करून शुभेच्छा दिल्या. डॉ सुनील गायकवाड यांची पुस्तके समाज उपयोगी आहेत असे म्हणाले. या प्रसंगी समरसता मंच चे महाराष्ट्र गोवा प्रमुख निलेश गद्रे म्हणाले की सध्याच्या काळात ज्या पुस्तकाची आवश्यकता आहे नेमके तेच पुस्तक लातूर चे माजी खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड यांनी लिहले आहेत. प्रधान मंत्री नरेंद्र मोदी आणि समरसता हे पुस्तक आणि भारतीय संविधान की विशेषताए
और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का दृष्टीकोन हे दोन्ही पुस्तके सध्याचा काळात आवश्यक आहेत ते सर्वांनी वाचावे असे आव्हान केले. दिल्ली च्या माजी नगर सेविका राजेश यादव या म्हणाल्या की डॉ सुनील गायकवाड यांनी लिहलेले दोन्ही पुस्तके सर्वांनी वाचावे आणि त्यांनी हे अभ्यासपूर्ण पुस्तके लिहली आहेत. कार्यक्रमा मधे देशातील आंध्रा प्रदेश, तामिळनाडू, दिल्ली, महाराष्ट्र, बिहार येथील काही गुणवंत महिला यांना अवार्ड देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष उपस्थित होते.
