संत चोखोबांचा समतेचा विचार सामाजिक एकतेसाठी महत्वाचा आहे – हभप शिवाजीराव मोरे महाराज देहूकर

महाराष्ट्र खाकी ( देहू (पुणे) / प्रतिनिधी ) – वारकरी संप्रदायातील महान संत संत चोखामेळा महाराज यांच्या साहित्यातील  विचारधन  असलेल्या ‘ संत चोखामेळा ‘ व संत चोखामेळा महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या साहित्यातील  समतेच्या  विचारांचा  जागर घडवणाऱ्या ‘ संत चोखोबा ते संत तुकोबा : समतेचा प्रवास या दोन महत्त्वपूर्ण ग्रंथांचे  प्रकाशन  मुख्य मंदिर, श्री संत तुकाराम  महाराज, देहू येथे  हभप  शिवाजीराव मोरे महाराज देहूकर यांच्या शुभहस्ते

करण्यात  आले याप्रसंगी ते बोलत होते , संत चोखोबांचा समतेचा विचार सामाजिक एकतेसाठी महत्वाचा आहे असे प्रतिपादन पुढे बोलतांना त्यांनी केले . याप्रसंगी ज्येष्ठ वंशज हभप माणिकबुवा मोरे महाराज , संस्थान अध्यक्ष प्रां. पुरुषोत्तम मोरे महाराज , लातूर चे माजी खासदार ग्रंथाचे लेखक डॉ सुनील गायकवाड, हभप संजय महाराज मोरे संत चोखामेळा अध्यासन अध्यक्ष सचिन पाटील सर, महंत प्रकाश महाराज शिंदे सदरील मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना प्रो, डॉ सुनील

गायकवाड  म्हणाले, परंपरेने कायमच  भेदभावाच्या  विरुद्ध लढा दिला आहे. चोखामेळा यांनी जात-पात  विसरून  विठ्ठलभक्ती  केली, तर  संत  तुकाराम  महाराजांनी  लोकांना सत्याचा आणि  साधेपणाचा मार्ग दाखवला. आजच्या काळातही आपण या विचारांचा स्वीकार केला, तरच खऱ्या अर्थाने संत परंपरेचा वारसा पुढे जाईल.”कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी सांगितले की, “समाजात भेदभाव, विषमता आणि अन्याय  दूर  करण्यासाठी  संत  विचारांचा  प्रसार  करणे  हीच खरी  भक्ती  आहे.  मोठ्या

उत्साहात पार पडले. या  कार्यक्रमाचे आयोजन संत चोखामेळा अध्यासन केंद्र व संपूर्ण संत विचार  समिती महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. सुप्रीम कोर्टाचे  माजी खासदार अ‍ॅड. डॉ. सुनील  गायकवाड लिखित “संत चोखामेळा” आणि “संत  चोखोबा  ते संत  तुकोबा समतेचा प्रवास” या दोन ग्रंथांचे  प्रकाशन  करण्यात आले. यावेळी  विविध  मान्यवरांनी आपले  विचार  मांडले. संत  चोखामेळा आणि  संत  तुकाराम महाराज यांनी समतेचा, भक्तीचा आणि सामाजिक

न्यायाचा संदेश दिला. या ग्रंथांद्वारे नव्या पिढीला हे विचार समजण्यास मदत होईल, असे विचार उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. या ग्रंथ प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने संत परंपरेतील विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करण्यात आला.  उपस्थित वारकरी संप्रदाय व भक्तगणांनी या ऐतिहासिक क्षणाचा आनंद घेतला.

Recent Posts