CM Devendr fadanvis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले

महाराष्ट्र खाकी ( विवेक जगताप ) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून भाजप आमदार सुरेश धस यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. या हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात

आला होता . या मोर्चाला सर्वपक्षीय आमदारांनी हजेरी लावली होती. या मोर्चात सर्व पक्षीय नेत्यांनी आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली आहे. विरोधकांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांनी फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशामुळे आरोपींच्या गळ्यावरील फास आणखी आवळल्याचे बोललं जात आहे. बीडमध्ये

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चाला मोठ्या संख्येने लोकांनी उपस्थिती दर्शवली होती. या मोर्चात लोकांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. तसेच यावेळी लोकांनी आरोपीच्या संपत्ती जप्त करण्याची मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.

Recent Posts