महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – गांधी चौक पोलिस ठाण्यातील निरीक्षक पी.आय. सुनील रेजितवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अवघ्या १२ तासांत जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला. कोयत्याने मारहाण करून मोबाईल व रोख रक्कम लुटणाऱ्या तीन निर्घृण आरोपींना धरले आणि मुद्देमालासह अटक केली. ३ जुलै २०२६ रोजी ओमकार सतिश वाघमारे हा घराकडे जात असताना गंजगोलाई येथील यशवंत शाळेजवळ तीन आरोपींनी त्याचा पाठलाग केला. कोयत्याने मारहाण करत त्याच्याकडील मोबाईल व ५,००० रुपयांची रोख रक्कम हिसकावून घेतली. एकूण १२,००० रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने लुटला. याप्रकरणी गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि उपविभागीय पोलिस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पी.आय. सुनील रेजितवाड यांनी तात्काळ पथक तयार करून तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारांच्या मदतीने आरोपींचा छडा लावला.
अटक करण्यात आलेले आरोपी
1) गौस शाडूल शेख
2) मेहराज फरीद शेख
3) शहाबाज शादुल्ला शेख (सर्व राहणार अंजली नगर, लातूर)
आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून ५,००० रुपयांची रोख व ७,००० रुपयांचा मोबाईल असा एकूण १२,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कामगिरीत PSI रायपल्ले, PSI प्रमोद देशमुख (गुन्हे प्रकटीकरण शाखा), पोलिस अमलदार राजेंद्र टेकाळे, रवीसन जाधव, राम गवारे, संतोष गिरी, सचिन चंद्रपाटले यांनी महत्वाची भूमिका बजावली. पी.आय. सुनील रेजितवाड यांच्या वेगवान आणि आक्रमक तपासामुळे लातूर पोलिसांनी एकदा पुन्हा आपली ताकद दाखवली आहे. गुन्हेगारांसाठी खाकी आता खरोखरच भीतीचे नाव बनली आहे



