अडचणीत असलेल्या भालके यांच्या पत्नीचा फोन अर्धवट बोलून कट करणारे आणि नंतर 5-6 फोन केले तरी न घेणारे API शिनगारे यांच्यावर पोलीस अधीक्षक कारवाई करणार का ?

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप  ) –  लातूर BDO तुकाराम भालके यांना 10 लाखाची खंडणी आणि संतोष बेंबडे यांची माफी मागा म्हणणारे खंदाडे यांच्यावर आणि संतोष बेंबडे यांच्यावर लातूर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे खंडणीचा गुन्हा दाखल करतील का ?  BDO भालके यांच्या पत्नी ने मदतीसाठी केलेल्या पोलीस

अधिकारी शिनगारे यांनी फोन कट करून नंतर फोन उचललाच नाही कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकारी शिनगारे यांच्यावर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे कारवाई करतील का ? जिल्ह्यातील शासकीय अधिकारी आणि विशेषतः पोलीस दलातील अधिकाऱ्यांना आपल्या टाचेखाली ठेवणाऱ्या संतोष बेंबडे यांनी आमदार

अभिमन्यू पवार यांच्या आशीर्वादाने अल्पावधीत प्रशासकीय अधिकारी बदली आणि विवीध कामात चांगला दबदबा निर्माण केला आहे. या मुळेच BDO भालके धमकी आणि खंडणी प्रकरण घडले आहे. 10 लाखांची खंडणी द्या आणि लातूरातील घर खाली करा अशी धमकी देत, 20 ते 25 तरुणांनी लातूर पंचायत समितीचे गटविकास

अधिकारी (BDO) तुकाराम भालके यांच्या घरावर काही दिवसापूर्वी ( दि. 10 वर- मंगळवारी ) हल्ला करत तोडफोड केली. मागील 15 दिवसांत BDO तुकाराम भालके यांच्या घरावरील हा दुसरा हल्ला होता . यापुर्वी 26 ऑगस्टला देखील भालके यांच्या घरावर हल्ला झाला होता. असे BDO भालके यांनी एका दैनिकाला सांगितले

आहे. सध्या लातूर पोलीस आणि जिल्ह्यातील विवीध प्रशासकीय अधिकारी बेंबडे यांच्या दबावात आणि मार्जित काम करत आहेत असे चित्र आहे. बेंबडे यांच्या मुळे भालके यांच्या प्रकरणात पोलिसांनी दुर्लक्ष केले आहे असे दिसत आहे कारण भालके यांच्या घरावर हल्ला होत असताना भालके यांच्या पत्नी यांनी विवेकानंद पोलीस

स्टेशन येथील शिनगारे यांना फोन करून आमच्या घरात काही माणसे दारू पिऊन घुसले आहेत साहेब तुम्ही या मला भीती वाटत आहे अशी विनंती केली त्यावर शिनगारे यांनी सांगितले की पोलीस येत आहेत इतक बोलून भालके यांच्या पत्नीचा फोन कट केला आणि नंतर फोन उचलला नाही असे भालके यांच्या पत्नी यांनी सांगितले. शिनगारे

पोलीस अधिकारी यांच्या या वागणुकीचा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे दखल घेतील का ? एक महिला मदतीसाठी पोलीस अधिकारी (शिनगारे) यांना फोन करते आणि त्या महिलेचा फोन कट करून नंतर न उचलले ही खूप मोठी गंभीर बाब आहे, पोलीस कर्तव्यात कसूर केला तर मोठी घटना घडते आणि कर्तव्य पार पडले तर गुन्हे होत नाहीत.

पण शिनगारे यांच्या या वार्ताणामुळे त्यांच्या कार्यावर संशय निर्माण होत आहे, का शिनगारे यांनी हे काम बेंबडे यांच्या दबावात किंवा त्यांना मदत व्हावी म्हणून भालके यांच्या पत्नीचा फोन कट केला आणि नंतर उचलला नाही. हे फक्त एक प्रकरण आहे असे अनेक प्रकरणात बेंबडे यांच्या आशिर्वादामुळे पोलीस अधिकारी कर्तव्यात कसूर करत आहेत.

Recent Posts