देश

भाजपच्या सर्व्हेत लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांचा स्ट्राईक रेट समाधानकारक नसल्याने तिकीट कापल जाऊ शकत !

महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – भाजपच्या नेतृत्वाकडून राज्यातील खासदारांचे अंतर्गत तीन सर्व्हे करण्यात आले. या सर्व्हेतून डझनभर खासदारांचा स्ट्राईक रेट समाधानकारक नसल्याचे समोर आले आहे अशी चर्चा आहे आणी या स्ट्राईक रेट समाधानकारक नसलेल्या खासदारांच्या यादी मध्ये लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे

यांचे नाव असल्याची भाजपाच्या नेत्या मध्ये चर्चा आहे. आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट वाटपावरून महाराष्ट्राच्या राजकारणात विशेषतः भाजपा मध्ये सध्या प्रचंड घडामोडी सुरु आहेत. भाजपच्या डझनभर विद्यमान खासदारांची तिकिटं कापलं जाण्याची शक्यता आहे. सामाजिक समीकरणांसह

स्थानिक पातळीवरील राजकारणदेखील या सर्व्हेत पाहण्यात आलं. काही विद्यमान खासदारांबाबत लोकांमध्ये असलेली नाराजी या सर्व्हेमधून समोर आली आहे. निवडून येण्याची हमी असलेल्या मजबूत उमेदवारांची आवश्यकता असल्याचं आता समोर येत आहे. या मुळे भाजपच्या या डझनभर विद्यमान

खासदारांचीदेखील धाकधूक वाढवणारी बातमी समोर आली आहे. भाजपच्या नेतृत्वाकडून राज्यातील खासदारांचे अंतर्गत तीन सर्व्हे करण्यात आले. या सर्व्हेतून डझनभर खासदारांचा स्ट्राईक रेट समाधानकारक नाही, अशी चर्चा भाजपाच्या गोटात सुरु आहे. स्ट्राईक रेट चांगला नसलेल्या खासदारांचं तिकीट कापलं जाऊ शकतं का ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय.

Most Popular

To Top