महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देणार्या निलंगा तालुक्यात शनिवारी ( दि.9 ) येथील महाराष्ट्र महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडलेल्या भव्य सभेला लाखोंच्या संख्येने मराठा बांधवांनी
उपस्थिती लावत संपूर्ण मैदान भरून आसपासच्या परिसरात जागा मिळेल त्या ठिकाणी उभा राहून सभा ऐकली. आतापर्यंतच्या इतिहासात एवढ्या मोठ्यासंख्येने झालेली ही एकमेव सभा असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केली. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून कुणबी म्हणून आरक्षण मिळावे, यामागणीसाठी मनोज जरांगे पाटील
यांनी अंतरवली सराटी येथून उभारलेल्या लढ्याचे लोण निलंग्यापर्यंत पोहोचले. शनिवारी ( दि.9 ) राञी 9 वाजता मनोज जरांगे पाटील यांची भव्य सभा निलंग्यात पार पडली.छञपती शिवाजी महाराज चौकातून बैवगाड्यांच्या ताफ्यातून मनोज जरांगे पाटील यांचे सभास्थळी आगमन झाले.छञपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व
जिजाऊ वंदनाने भाषणास सुरूवात झाली. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाने मागील कित्येक वर्षांपासून अनेक नेत्यांना मोठे केले.त्यांनी त्यांचा परिवार मोठा करणे आणि मराठा समाज मागास ठेवणे हाच उद्देश ठेवला. मराठ्यांच्या पोरांची मोठा अधिकारी होण्याची स्वप्न धुळीला मिळाले. वारंवार आरक्षणाची मागणी करूनही
सरकारकडून समित्या स्थापन करण्यात येतात; पण आरक्षण आणि कुणबी वेगळे असे सांगण्यात आले.नोंदी मिळत नसल्याचे सांगून दिशाभूल करण्यात आली.आता मराठा समाज जागा झालाय,एकवटला आहे. मराठे रणांगणात उतरले तर मागे हाटत नाहीत. हा मराठ्यांचा इतिहास आहे.आपल्या एकजुटीने सरकारला जेरीस
आणले आहे. 24 तारखेपर्यंत आरक्षण देतो असे आश्वासन मुख्यमंञी एकनाथ शिंदे,उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. जर दगाफटका दिला तर तुम्हाला सोडणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. आरक्षण तर आम्ही घेणारच माञ 70 वर्षांचे नुकसानही भरून काढणार. नोंदी नसणार्या समाजाला
ओबीसीमधून आरक्षण मिळाले. 1988 ला मंडळ कमिशन स्थापन झाले. मंडळ कमिशनने ठरवून दिलेले एकही काम केले नाही. कोणालाही मागास सिध्द न करता अहवाल सादर केला. 1990 ओबीसीला 14 टक्के आरक्षण दिले.पुन्हा 1994 ला 30 टक्के आरक्षण देण्यात आले.कोणतेही निकष पूर्ण न करता चार वर्षांत आरक्षण
कसे वाढवले, असा प्रश्न उपस्थित करत मराठ्यांचे 16 टक्के आरक्षण एका राञीत वाटून टाकण्यात आले,मराठा हा ओबीसी आरक्षणात होता. मागासवर्गीय आयोगासाठी लागणार्या सर्व निकषालाही आम्ही पाञ ठरताहेत,तर मग आम्हाला ओबीसीतून आरक्षण का नाही ? असा सवाल त्यांनी केला.या आंदोलनामुळे आतापर्यंत ओबीसी
आरक्षणाचा लाभ न मिळालेल्या 35 लाख कुणबी नोंद असलेल्यांना लाभ मिळत आहे आपले आंदोलन 80 टक्के यशस्वी झाल्याचे ते म्हणाले. आत्महत्या केलेल्या सावनगिरा येथील करण सोळुंके यांच्या परिवाराची व्यसपीठावर मनोज जरांगे पाटील यांनी भेट घेऊन विचारपूस केली. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
महिलांच्या हाती बैलगाड्यांचे सारथ्य..! आंदोलनात आम्ही महिलाही मागे नाही, असा संदेश देत राञी उशिरा असलेल्या सभेसाठी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.विशेष म्हणजे छञपती शिवाजी महाराज चौकातून 21 बैलगाड्यांच्या रॅलीतून त्यातील एका गाडीत मनोज जरांगे पाटील यांना घेऊन रॅली सभास्थळापर्यंत आणण्यात
आली.त्या बैलगाड्यांचे सारथ्य महिलांच्या हाती होते.विचारपीठावर मनोज जरांगे पाटील यांचा सत्कारही पाच मुलींच्या हस्ते करण्यात आला.एवढेच नव्हे तर जवळपास 300 महिलांनी स्वंयसेवक म्हणून जबाबदारी स्विकारली होती.