लातूर पोलीस अधीक्षक IPS सोमय मुंडे यांना IIT कडून श्री.सत्येंद्र कुमार दुबे पुरस्कारा जाहीर

महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) लातूर पोलीस अधीक्षक IPS सोमय मुंडे यांना सत्येंद्र कुमार दुबे पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सोमय मुंडे हे त्यांच्या प्रामाणिक, कुशाग्र आणि धाडसी प्रतिमेसाठी ओळखले जातात.  भारतीय तंत्रज्ञान संस्था कानपूरचा सत्येंद्र के दुबे स्मृती पुरस्कार सत्येंद्र के दुबे (BT/CE/

1994) यांच्या स्मरणार्थ त्यांच्या अनुकरणीय जीवनासाठी आणि सार्वजनिक जीवनातील भ्रष्टाचाराशी लढताना सर्वोच्च बलिदानासाठी स्थापित करण्यात आला. हा पुरस्कार कोणत्याही IIT च्या माजी विद्यार्थ्याला दिला जातो ज्याने मानवी मूल्यांचे पालन करण्यासाठी सर्वोच्च व्यावसायिक सचोटी दाखवून स्वतःला वेगळे केले आहे.

IIT कानपूरच्या स्थापना दिनी (2 नोव्हेंबर) हा पुरस्कार दिला जातो. यावेळी IIT कानपूरने या पुरस्कारासाठी लातूर पोलीस अधीक्षक IPS सोमय मुंडे यांची निवड केली आहे. सोमय मुंडे  हे IIT मुंबईचे विद्यार्थी होते .अभियंता सत्येंद्र कुमार दुबे यांचा खून त्यांच्या प्रामाणिकपणामुळे झाला. सत्येंद्र दुबे हे आयआयटी कानपूरचे विद्यार्थी होते . यावेळी IIT कानपूरने या

पुरस्कारासाठी सोमय मुंडे यांची निवड केली आहे. सोमय मुंडे हे IIT मुंबई विद्यार्थी राहिले आहेत सोमय मुंडे हे त्याच्या प्रामाणिक, कुशाग्र आणि धाडसी प्रतिमेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय पोलीस अधिकारी आहेत . IIT कानपूर 2023 च्या सत्येंद्र कुमार दुबे मेमोरियल पुरस्काराने लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत

असलेले सोमय मुंडे यांना सन्मानित करणार आहे .सोमय विनायक मुंडे हे नांदेडच्या देगलूरमधील आहेत. मुंडे यांनी IIT मधून एमटेक केलं आहे. त्यांचं प्राथमिक शिक्षण देगलूरमधीलच साधना हायस्कुलमध्ये झालं. पुढील शिक्षण त्यांनी सातारा सैनिक स्कुलमधून आणि राष्ट्रीय मिलटरी कॉलेज, देहरादूरमधून केलं. सोमय यांनी एमटेकची पदवी

IIT मुंबईतून घेतली आहे. त्यानंतर त्यांनी मार्ग बदलला आणि ते यूपीएससीकडे वळाले. 2016 मध्ये दुसऱ्या प्रयत्नात सोमय मुंडे यांना यश मिळाले आणि महाराष्ट्र कॅडरचे IPS अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. सोमय मुंडे यांना गडचिरोलीतील मर्दिनटोला छत्तीसगड राज्याच्या सीमेलगत असणाऱ्या घनदाट जंगलाच्या परिसरात 13

नोव्हेंबर 2021 ला आपल्या तुकडीच्या पोलसी जवानांसोबत 26 नक्षलवाद्यांचा खात्मा केला . त्यांच्या या पराक्रमाची दखल घेत भारत सरकारद्वारे दिला जाणारा पोलिस दलातील अत्यंत मनाचा शौर्य पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले होते. सोमय मुंडे सध्या लातूर जिल्हा पोलीस म्हणून कार्यरत

आहेत आणि लातूर जिल्ह्यातील विवीध कारवायामुळे त्यांचे नेहमी कौतुक होत असते. खास काडून राज्य महिला आयोगा काडून त्यांच्या कार्याचे कौतुक झाले आहे.

Recent Posts